तर शेतकरी मित्रांनो सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल आपल्याला माहिती मिळाली आहे ती माहिती आहे की पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई लवकरच आपल्याला मिळणार आहे तर सविस्तर माहिती आपण खाली दिली आहे
पावसाच्या नुकसानीची मदत दहा दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय
राज्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये अवकाळी पाऊस झाला होता या पावसामुळे शेतकऱ्याचे बरेच नुकसान झाले आहे पावसाने झालेल्या नुकसान मदत दहा दिवसात वितरित करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ झालेल्या बैठकीमध्ये नाशिक औरंगाबाद अमरावती नागपूर आणि पुणे विभागामधून राज्य सरकारकडे 3128 कोटी 96 लाख रुपयांचे प्रस्ताव आले आहेत.
मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीमध्ये पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मदतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे
राज्य सरकारने निकषहि कशी तयार केले आहेत. आणि प्रस्तावही प्राप्त झालेले आहेत
मदत पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रस्तावा संबंधित पडताळणी सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही मदत वितरीत केली जाईल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असे सांगण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या वर अन्य मंत्र्यांनीही मदत तातडीने वितरीत करण्याची गरज आहे अशी त्यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरात लवकर ही मदत वितरित करा असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्याना दिलं.
यावर पुढील दहा दिवसांमध्ये रक्कम वितरित करू अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे. राज्य सरकारने याच्या आधी सतत झालेल्या पावसामुळे नुकसान शेतकऱ्यांना निकष ठरवण्याआधी. 775 कोटी 69 लाख 43 हजार रुपयांचा निधी त्यांनी वितरित केला आहे. मात्र पन झालेल्या पावसामुळे नुकसानीची प्रस्तावांची संख्या आणि देण्यात येणारी मदत पहाता यापुढे येणाऱ्या प्रस्तवांची निकषांची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली नेमले गेलेले समितीने निकष निश्चित केले आहेत.
शास्त्रीय निकष द्वारे शेतीची पाहणी होणार आहे. मागे झालेल्या नुकसाननीचा डाटा असल्याने या निकषद्वारेच प्रस्तावांची पडताळणी करून रक्कम निश्चित केली जाईल
जास्त काटछाट नको ‘
सततच्या पावसामुळे झालेली नुकसान त्यासाठी तयार केलेले निकष अतिशय किचकट असून, एनडवी ही प्रणाली शासकीय आहे . त्यामुळे आलेल्या प्रस्तावांना कुठेतरी कात्री लागणारच आहे हे निश्चित आहे. 3 हजार 128 कोटी 93 लाख 83 हजार रुपयांपैकी फक्त एक हजार कोटी ची मदत दिली जाईल असा अंदाज आहे. जर असे झाल्यास शेतकऱ्यांच्या रोशाला समोर जावा लागेल. त्यामुळे प्रस्तावांना जास्त काही काटछाट करू नका असे, काही मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सांगितले आहे. आता जर का निकषांना बागल दिली तर पुढील काळातील तसेच करावे लागेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले .
आतापर्यंत कधीच पावसाने झालेल्या नुकसानी बद्दल मदत दिली गेलेली नाही. त्यामुळे त्या गोष्टींसाठी निकष ठरविण्यात आले आहेत. आता जर ही मदत दिली जाणार आहे त्यासाठी केलेले निकष आणि मानदंड पुढील काळातही लागू होतील. त्यासाठी योग्य त्या प्रस्तावांचा पडताळणी करून पुढील दहा दिवसात मदत केली जाईल