बीडमध्ये पोलीस पाटील भरती– तर बीड जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होणार आहे काही दिवसांपूर्वी पोलीस पाटील भरती सुरू झाली होती. संपूर्ण 945 पदे रिक्त आहेत या पदांकरिता बीड जिल्ह्यात पोलीस पाटील भरती होणार होती.
जिल्ह्यात सध्याच्या स्थितीला पोलीस पाटलांचे सुमारे 945 पदे रिक्त असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडे आहे.
मात्र रिक्त पदांची एकूण संख्या सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना 2022 मध्ये डिसेंबर महिन्यात देण्यात आली होती त्यानंतर बिंदू नामावली तयार करून विभागीय आयतांकडून मंजूर करून घेण्यापासून ते पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याच्या कालावधीबद्दल कार्यक्रम सर्व राबविण्यात येणार होता.
16 जानेवारी ते 29 एप्रिल 2023 या कालावधीत पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवली जाणार होती परंतु आरक्षणाबाबत मार्गदर्शन नसल्याने ही भरती लटकलेली आहे.
परळी व माजलगाव उपविभागीय अधिकाऱ्यांनी पोलीस पाटील 2023 प्रक्रिया वेळेत पार पाडण्यासाठी बिंदू नामावली वेळेत मंजूर केली होती. व पोलीस पाटील पदासाठी आरक्षणाची पदे ठरवितांना अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती , विमुक्त जाती ,विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब भटक्या जमाती क व इतर मागासवर्गीय या क्रमानुसार सर्वांना पदे निश्चित करण्यात यावी.
प्रत्येक गावातील पदे आरक्षित करण्यासाठी त्या त्या प्रभागातील लोकसंख्या अशी टक्केवारी ही ज्या गावात जास्त असेल त्यात गावा त सुरुवात करून उतरत्या क्रमाने ठराविक असे शासन निर्णय नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यात पोलीस पाटलांची 945 मध्ये रिक्त असल्याने तात्काळ भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश केले होते त्यानुसार भरतीचा कार्यक्रम सुद्धा जाहीर केला होता परंतु इ डब्ल्यू एस प्रवर्गाकरिता आरक्षणाचा विषय समोर आल्या असल्याने मार्गदर्शन मागवले होते त्यावर अद्याप उत्तर आले नाही.
हे पण वाचा – अंगणवाडी भरतीसाठी लागणारे कागदपत्रे व अंगणवाडी भरतीसाठी कसा अर्ज करायचा पाहण्यासाठी क्लिक करा.
अशाच नवीन भरतीच्या माहितीसाठी व शेती विषयक योजना व सरकारी योजना माहितीसाठी वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप लिंक वर क्लिक करा व आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा लवकरात लवकर तुम्हाला अशाच अपडेट व्हाट्सअप वरती मिळत राहतील वही पोस्ट तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद.