पीएम किसान सम्मान निधि– PM KISHAN योजनेचा 14 वा हप्ता आत्ता या तारखेला पडणार आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान किसान सामान्य निधी या योजनेचा हप्ता 30 जून रोजी लाभार्थ्यांच्या खात्यावर पडणार आहे अशी माहिती होती. पण हप्ता 30 जूनला नाही पडला.व जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल अशी शक्यता आहे. देशातील बरेच शेतकऱ्याने E-KYC आधार कार्ड अपडेट केलेले नाहीत त्यामुळे .14 हप्तासाठी त्यामुळे वेळ लागला आहे .
PM KISHAN योजनेचा तेरावा हप्ता हा 27 फेब्रुवारी 2023 रोजी पडला होता. त्यामुळे हा जून महिन्यात चौदावा हप्ता जमा होणार असल्याचे सांगितले जात होते. पी एम किसान योजनेचा 14 हप्ता विषयी सोशल मीडिया जोरदार चर्चा सुरू होती
व पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्याला देण्यात येतात. व पी एम किसान योजनेचे तीन हप्ते असतात.
ज्या शेतकऱ्यांची E-KYC आधार कार्ड अपडेट केलेले नसेल तर त्यांना पीएम किसान योजनेचा मिळणार नाही. असे सांगितले जात आहे ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत त्यांना हप्ता मिळेल केंद्र सरकारने या आधी E-KYC आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 23 जुन 2023 वेळ दिली होती.
जर शेतकऱ्याच्या आधार कार्ड अपडेट मध्ये काही चूक झाली तर शेतकऱ्याला 14 वा हप्ता थांबवला जाऊ शकतो. जर तुमची E-KYC झाली नसेल तर लवकरात लवकर करावे लागणार आहे.
असे अनेक शेतकरी आहेत की ज्यांच्या बँके खात्यात काही अडचणीमुळे त्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी चे पैसे वेळेवर मिळत नाहीत. अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या बँकेत जाऊन खात्यातील तांत्रिक चुका लवकरात लवकर दुरुस्त करून घ्याव्यात व दुरुस्ती नाही केल्यावर तुम्हाला पीएम किसन योजनेचा 14 वा हप्ता मिळणार नाही.
ऑनलाइन ही केवायसी कसे करायचे आहे ?
1 ऑनलाइन E-KYC करण्यासाठी शेतकऱ्याला प्रथम पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावा लागणार आहे.
2 ) या अधिकृत वेबसाईटवर E-KYC पर्याय या दिले दिलेला आहे. दिलेल्या पर्यायावर क्लिक करा.
3) तुम्ही E-KYC या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ज्या शेतकऱ्याचा आहे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर लिहिण्यासाठी एक जागा मिळेल . त्या दिलेल्या जागेवर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल
4) त्यानंतर पी एम किसान सन्माननिधी ची लिंक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणी मोबाईल क्रमांकावर OTP येईल. आलेला ओटीपी प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करून सबमिट करा.
5) या संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर , तुमची केवायसी कम्प्लीट होईल. व यानंतर तुम्हाला पी एम किसान या योजनेचा हप्ताचा लाभ मिळेल.
हे पण वाचा –Crop insurance – असा भरा 1 रु मध्ये पीक विमा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा – जॉईन करा