Bank Sakhi Yojana | आजच्या युगात महिलांना सशक्त अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीत सरकार महिलांना (women schemes) सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी वेळोवेळी अनेक योजना राबवत आहे. महिलांसाठी अशीच एक योजना ती म्हणजे बँक सखी योजना. ही योजना सध्या खूप चर्चेमध्ये आहे. या योजनेद्वारे महिला दर महिन्याला चाळीस हजार रुपये कमवत आहेत. बँक सखी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महिला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी भर दिला जात आहे.
सरकारद्वारे सुरू असलेली बँक सखी योजनेअंतर्गत ग्रामीण महिलांना बँक सखी बनवले जाते. जे गावातील लोकांच्या बँकेची संबंधित गरजा पूर्ण करतात. ग्रामीण भागातील जे लोक बँकेत जाऊ शकत नाही किंवा त्यांचा घरापासून बँक खूप दूर आहे. बँक सखी त्यांच्या घरी बँकिंग सुविधा उपलब्ध करून देते. ही योजना उत्तर प्रदेश वेगाने सुरू आहे देशातील इतर राज्यात या योजनेचा अवलंब करून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण करत आहेत. चला तर जाणून घेऊया या योजनेची सविस्तर माहिती.
बँकेची योजना म्हणजे काय ?
तुम्हाला तर माहीतच आहे भारतामध्ये अशी लाखो गावी आहेत जी शहरांच्या संपर्कापासून दूर आहेत. त्यांना शहरात जाणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत गावातील वयोवृद्धांना पेन्शन, मनरेगा भरणे तसेच बँक खाते उघडण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागू नये. यासाठी केंद्र सरकारच्या बँक सखी योजना अंतर्गत महिलांना प्रशिक्षण दिले जाते. व बँकेची संबंधित सर्व कामे गावातच झाले पाहिजेत.
बँक सखी बनण्यासाठी पात्रता काय
बँक सखी बनण्यासाठी महिलांना प्रशिक्षणानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे. बँक सचिन बँकिंग कामासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.बँकिंग सगळे जितके अधिक बँकेचे काम पूर्ण करेल तितके तिला अधिक प्रोत्साहन मिळेल. अशा परिस्थितीत महिला बँक सखी बनवून 25 ते 40 हजार रुपये पर्यंत दरमहा कमवू शकता.