Weather Update: 25 ते 26 डिसेंबर दरम्यान तापमानात किंचीत वाढ होण्याची शक्यता असून त्यानंतर तापमान पुन्हा घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला केला आहे.
नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी शुक्रवारपासून देशाच्या हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळणार आहे. नवीन वेस्टर्न डीस्टबर्न्सच्या प्रभावामुळे ढगा वातावरणासह अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे. काश्मीर खोऱ्यात सुरू झालेल्या बर्फवष्टी मुळे मैदानी भागात वेगाने थंडी वारे वाहत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार थंड वाऱ्याचा वेग आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम उत्तर भारतात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे डिसेंबर अखेर तापमान आणखीन घटनेची शक्यता आहे.
तापमानात किती घट होणार?
यादरम्यान 24 ते 25 डिसेंबर या कालावधीत किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. बहुतांश राज्यात हवामान कोरड राहील. येत्या काही दिवसात काही भागात सकाळी धुके पडण्याची शक्यता देखील आहे. 26 ते 27 डिसेंबर दरम्यान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात पुन्हा घट होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
या भागात पाऊस होण्याची शक्यता
राजस्थान हवामान विभागाच्या मते नवीन वेस्टर्न डीस्टबर्न्सच्या प्रभावामुळे काही ठिकाणी हलका पाऊस ते मध्यम स्वरूपात रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे. उर्वरित बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून पावसाची शक्यता फारशी कमी आहे. २३ डिसेंबर पासून पुढील एका आठवड्यात देशातील बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तामिळनाडूच्या चार जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देखील दिला आहे. तामिळनाडू मध्ये पूर्वस्थिती काय आहे तसेच राजस्थान मध्ये ही आज पावसाची शक्यता आहे.
हे पण वाचा :-महाराष्ट्रात नव्या जिल्ह्याची निर्मिती कधी होणार? पहा सर्व सविस्तर माहिती
Weather Update
पुढील 24 तासात जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच IMD च्या अंदाजानुसार 24 आणि 25 डिसेंबर रोजी उत्तराखंडच्या अनेक भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि त्रिपुरामध्ये पुढील 24 तासात दाट धुके पडेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्राचा उत्तर भारतात थंडीची लाट
उत्तर भारतात थंडीची लाट पाहायला मिळत आहे मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील तापमान घसरला आहे. महाराष्ट्र सोबत उत्तर भारतात पारा कमालीचा घसरला आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार गेल्या 24 तासात पंजाब, हरियाणा, चंदिगड दिल्ली, उत्तर राजस्थानच्या बहुतांश भागात किमान तापमान 4-8 अंश सेल्सिअस इतके होते आणि बहुतेक उत्तर प्रदेश, दक्षिण राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार झारखंड मध्ये आणि अंतर्गत ओडिसा या काही भागात 8-12 अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळाले.
हे पण वाचा:- राज्यात गारठा वाढलाय, हवामान विभागाने स्पष्ट सांगितले