Weather This Week: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसापासून बदल पाहायला मिळत आहे. विशेषता गेल्या पंधरा दिवसात हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. हिवाळ्यात होत असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्या वर्षी म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नवीन वर्षात जानेवारी महिन्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्याचबरोबर आता फेब्रुवारी देखील अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू होण्याचा अंदाज आहे.
भारतीय हवामान खात्याने आज राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ भागातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ हवामान अभ्यासात पंजाबराव यांनी आता राज्यात येणाऱ्या काही दिवसात हवामान कोरडे राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज पासून ते 29 फेब्रुवारी पर्यंत हवामान प्रामुख्याने कोरड्या स्वरूपाचे राहील. या दरम्यान राज्यात कुठेही अवकाळी पाऊस पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांची चिंता नाहीशी झाली आहे. असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. Weather This Week
या कालावधीत रब्बी हंगामातील पीक काढण्यासाठी तयार झालेल्या पिकाची काढणी करून, काढलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कारण राज्यात पुन्हा एकदा फेब्रुवारी अखेरीस अवकाळीचे ढग येणार असल्याचे पंजाबराव यांनी सांगितले.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 29 फेब्रुवारी पासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे हा पाऊस मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहे. 29 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीमध्ये राज्यात अवकाळी पावसाची दाट शक्यता तयार होणार असा अंदाज पंजाबराव यांनी दिला आहे.
पंजाबराव यांनी सांगितलेल्या कालावधीत राज्यातील कोणत्या भागात पाऊस पडणार याबाबत अद्याप त्यांनी काही सांगितले नाही. पण लवकरच याबाबत डख यांच्याकडून माहिती दिली जाणार आहे.
हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! सोयाबीनचे बाजार भाव 6 हजारावर, या कारणामुळे होणार सोयाबीनच्या दरात वाढ…