राज्यात या ठिकाणी होणार वादळी वाऱ्यासह गारपीट..! हवामान विभागाने दिले ऑरेंज अलर्ट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Forecast Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात परळी ठिकाणी गारपिटीचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. या ठिकाणी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट देखील दिला आहे. पूर्व मोसमी पावसाची सरिनी राज्यात तडाखा दिला आहे. पावसाळी वातावरणामुळे उन्हाच्या चटक्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आज राज्यात वादळी वाऱ्यासोबत गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात ठिकाणी गारपीट होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. सकाळपासून 24 तासांमध्ये अमरावती, वाशिम, यवतमाळ, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, सातारा, नगर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

ढगाळ आकाशामुळे कमल तापमानात घट झाली आहे. अकोला येथे राज्यातील सर्वात जास्त 42.5 अंश सेल्सिअस तापमान आहे. तर वाशिम येथे 42 अंश आणि धुळे, मालेगाव, वर्धा येथे 41 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तर मराठवाडा पासून कर्नाटक केरळ ते कमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दबावाचा पट्टा सक्रिय आहे.

राज्यात पूर्व मोसमी पावसाला सुरुवात झाली असून, आज राज्यातील बऱ्याच भागात वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाचा इशारा व तळण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आले आहे. Weather Forecast Today

या ठिकाणी वादळी, गारपिटीचा पावसाचा अंदाज (ऑरेंज अलर्ट)

पुणे, सातारा, लातूर, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वाशिम या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे.

या ठिकाणी वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या ठिकाणी सर्वात जास्त तापमान आहे

अकोला 42.5 अंश, वाशिम 41.2 अंश, मालेगाव 41.0 आंश, वर्धा 41.0 अंश या ठिकाणी सर्वात जास्त तापमान नोंदवण्यात आले आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!