Weather Forecast Today: नमस्कार मित्रांनो, भारतीय हवामान विभागाने 5 ते 9 मे पर्यंत राज्यामध्ये हलक्या ते मध्यम वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाडा, विदर्भात ढगाच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस उन्हाचा चटका कायम राहणार असून येथे आठवड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या चक्रकार वाऱ्याची स्थिती उप हिमालय पश्चिम बंगाल कडून मराठवाड्याकडे सक्रिय झाले आहे. परिणामी ईशान्य भारतासह मराठवाडा, विदर्भ खानदेशात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. येत्या 24 तासात तापमानात 4 ते 5 अंशाची वाढ होण्याचा अंदाज आहे. म्हणजे 24 तासात राज्यात गर्मी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात मराठवाड्यात आणि विदर्भ खानदेशात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. Weather Forecast Today
पहा कुठे पडणार पाऊस व कोठे पडणार उष्णतेची लाट?
- ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात उष्ण हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
- उद्यापासून मराठवाड्यातील नांदेड, लातूर तर खानदेशातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
- यावेळी पावसाचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रति तास राहणार असून या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.