Weather Forecast : पूर्ण ऑक्टोबर महिना कोरडा गेल्याने राज्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने काही जिल्ह्यातील तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला असून तिथल्या भागात दुष्काळ ग्रस्त सवलती लागू करण्यात आलेले आहेत. परंतु गेल्या दोन-तीन दिवसापासून अवकाळी पावसाने राज्यामध्ये धुमाकूळ घातला आहे पुढील 24 तासात पाऊस पुन्हा पडणार आहे कोकण मध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिलेला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मध्य महाराष्ट्र ठिकाणी शुक्रवारी पाऊस झालेला आहे. अवकाळी पावसामुळे वातावरणामध्ये बदल झाला आहे अनेक शहराच्या तापमानात घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान यवतमाळमध्ये नोंदवले गेले आहे यवतमाळचे तापमान 16 अंश सेल्सिअस होते.
पुणे शहर आणि जिल्ह्यात पाऊस
शुक्रवारी पुणे शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला आहे. पुणे शहरात असलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली दिवाळीच्या तयारीची लगबग सुरु असताना. पुणे शहरात पावसात पाऊस झाला पुणे जिल्हा अवकाळी पावसाने चांगले झोडपलेले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस झालेला आहे. या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले होते .अचानक आलेला पावसाचा फटका शेतात काढणीला आलेल्या शेती पिकांना बसणार आहे. परंतु रब्बी हंगामासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. पावसाचा फटका सातारा सह ग्रामीण भागाला बसलेला दिसून येत आहे. दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या अचानक आलेल्या पावसामुळे चांगलीच फजिती झाली.