Weather forecast : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र मध्ये पावसाने दांडी मारली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य जनतेसह शेतकरी चिंतेत आहे. खरीप हंगामातील पिके पाऊस पडत नसल्याने अक्षरशा करपून गेले आहेत तर काही ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जुलै महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला होता. व शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये देखील चांगला पाऊस होईल अशी आशा होती.
पण तसे काही झाले नाही या ऑगस्ट महिन्यामध्ये आतापर्यंत एकदाही राज्यात कुठेही मुसळधार पाऊस झालेला नाही राज्यातील काही भागात तर या ऑगस्ट महिन्यात रिमझिम सरी देखील पडले नाहीत. त्यामुळे बळीराजाची चिंता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जर राज्यात लवकर पाऊस झाला नाही तर संपूर्ण खरीप हंगाम पिके वाया जाण्याची भीती आहे.
विहिरींना सुद्धा पाणी नाही राज्यातील प्रमुख धरणामध्ये अजून शंभर टक्के पाण्याचा साठा तयार झालेला नाहीत त्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न चाराचा प्रश्न सर्व समोर येणार आहे सर्वत्र पावसाची अभावी चिंचेचे वातावरण तयार झाले आहे अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डक यांनी एक नवीन हवामान अंदाज सांगितला आहे.
हे पण वाचा: पी एम किसान योजनेची नवीन अपडेट तुम्हाला हे करावे लागेल तरच मिळतील योजनेचे पैसे
पंजाबराव डक 27 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात कसं हवामान राहणार आहे याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे पंजाब रोडक यांनी सांगितल्याप्रमाणे 30 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रात काही ठिकाणी चांगला पाऊस पडू शकतो मात्र काही भागात पावसाची राहणार असल्याचे सांगितले तर टिळक ठिकाणी रिमझिम सऱ्या पडतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
कोणत्या ठिकाणी पडणार पाऊस
पंजाबराव डक यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाज 27 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, भंडारा ,अमरावती ,बोरगाव ,अकोला ,अंजनगाव सुर्जी, वाशिम, पुसद ,रिसोड, औंढा, कळमनुरी ,जिंतूर ,लोणार ,देऊळगाव राजा ,टेम्भूर्णी, सिंदखेडराजा, हसनाबाद, सिल्लोड, जाफराबाद ,जळगाव ,माहूर गाव, चाळीसगाव, मालेगाव, वैजापूर ,धुळे ,अंमळनेर ,कोपरगाव ,पाचोरा ,श्रीरामपूर ,शिर्डी, आष्टी, अहमदनगर ,राहुरी ,छत्रपती संभाजी नगर ,पाथर्डी ,मंठा ,बीड, गेवराई, पाटोदा, करमाळा, सोलापूर ,पंढरपूर ,इंदापूर ,अकलूज ,परंडा ,सांगली ,मसवड, कामाठी ,शिरूर ,लातूर ,जळकोट ,श्रीगोंदा ,धाराशिव ,या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या सर्व भागांमध्ये 15 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर पाऊस पडणार असे त्यांनी यावेळी सांगितले आहे तसेच पंजाबराव यांनी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर,परभणी ,जालना ,अहमदनगर ,बीड, पंढरपूर, सोलापूर, लातूर ,यवतमाळ ,नांदेड ,भंडारा ,चंद्रपूर ,गोंदिया ,या जिल्ह्यामध्ये कालावधीत मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
यावर्षी पंजाब डक यांचे बहुतांश अंदाज फेल ठरले आहेत यामुळे तरी अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहेत.
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर हवामान अंदाज विषयी माहिती मिळेल