Weather forecast : येत्या तीन ते चार दिवसात पडणार मुसळधार पाऊस…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather forecast : येत्या काही दिवसापासून राज्यामध्ये पावसाने दांडी मारलेली आहे. राज्यामध्ये मराठवाडा विभागात तुराळीत ठिकाणी पाऊस झालेला आहे. राज्यात बऱ्याच दिवसापासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे. पाऊस बऱ्याच दिवसापासून झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. हवामान विभागाने आठवडाभर हवामान अंदाज दिल्यानंतर आता पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मराठवाड्यामध्ये काही भागात मेघागर्जनासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.

आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे हवामान अंदाजानुसार येत्या तीन ते चार दिवसात राज्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक भागांमध्ये कमीत कमी सरासरीपेक्षा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मराठवाड्यामध्ये 17 ते 19 ऑगस्टपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये तुरळ ठिकाणी मेघगर्जनासह पावसाचा इशारा हवामान अंदाजाने देण्यात आलेला आहे.

मान्सूनचा आज पोषक स्थितीवर येत असून कमी दाबाचा पट्टा दोन ते तीन दिवसात सर्वसाधारण स्थितीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पावसाचे पुनर आगमन होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे के. एस होळकर यांनी याबाबत सूचना दिली आहे.

आज दिनांक 16 ऑगस्ट बुधवार रोजी नाशिक धुळे व बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून उर्वरित सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार 17 ऑगस्ट रोजी नांदेड मध्ये तर 18 व 19 ऑगस्ट रोजी हिंगोली परभणी जालना औरंगाबाद व नांदेड या सर्व जिल्ह्यांमध्ये ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे यावेळी वाऱ्यांचा ताशी वेग 30 ते 40 किलोमीटर असण्याची शक्यता वर्तवली आहे.

अशाच हवामान आंदाज साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचे जेणेकरून तुम्हाला हवामान अंदाज विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी

1 thought on “Weather forecast : येत्या तीन ते चार दिवसात पडणार मुसळधार पाऊस…”

Leave a Comment

error: Content is protected !!