Weather Forecast: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये सहा मे पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. साथ मे ते अकरा मे दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
महाराष्ट्र राज्याचा 7 ते 11 मे दरम्यान मुसळधार अवकाळी पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. राज्यात सध्या कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाका वाढला आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी येत्या आठवड्यात हवामान कसे असेल याचा अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये 6 मे पर्यंत हवामान कोरडे राहणार असल्याचे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. त्यानंतर 7 मे ते 11 मे दरम्यान राज्यात जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. 7 मे ते 11 मे दरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह विजेचा गडगडाट व अवकाळी पावस पहायला मिळणार आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता देखील पंजाबराव डख यांनी व्यक्त केले आहे.
7 मे ते 11 मे दरम्यान जोरदार अवकाळी पावसाची शक्यता
पूर्व विदर्भात यादरम्यान विजेच्या गडगडाटासह वादळी पाऊस होणार आहे. 7 मे च्या अगोदर शेतकऱ्याने त्यांच्या शेतातील कामे आवरून घ्यावेत. हळद कांदा काढून झाकून ठेवा कारण त्यानंतर जोरदार पावसाची सुरुवात होणार आहे. मराठवाड्यातही 7 मे पासून पुढील पाच दिवस जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी सहा मे पर्यंत कांदा कापूस हळद पिकाची काढणी करून ते नीट झाकून ठेवा व सावधान गिरी बाळगा असा इशारा हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही हे पाच दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. Weather Forecast
यादरम्यान हा पाऊस उसाच्या पिकासाठी फायदेशीर असणार आहे. या सोबतच कोकणातही 7 मे पासून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आतापर्यंत उन्हाळ्यात झालेल्या पावसापेक्षा सात ते अकरा मे दरम्यान जोरदार अवकळे पाऊस होणार आहे. असा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.