weather forecast : हवामान अंदाजाचे अभ्यासक पंजाबराव डक यांनी महाराष्ट्र राज्यातील जवळपास 18 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता सांगितली आहे. मराठवाड्यातील विदर्भ आणि काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व वर्तवला आहे.
बंगालच्या खाडीत तयार झालेल्या चक्रीवादळामुळे हा पाऊस पडणार आहे. या बंगालच्या गाडीत तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राला काहीही धोका नाही.
परंतु याच्या प्रवाहाखाली राज्यात झिंम झिंम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळामुळे मोठा पाऊस देखील पडणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांचे आरमाफ नुकसान झालें आहे. अगदी तळहाताच्या फोडा प्रमाणे जोपासलेले पीक अवकाळी पावसामुळे वाया गेले आहे.
यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची चिंता आणखीन वाढत आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या पूर्व विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, चांदूरबाजार, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडतं असल्याचे वर्तवले आहे.
मराठवाड्यातील लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी बारीकसा पाऊस पडण्याचे सांगितले आहे. मात्र मराठवाड्यात पडणारा पाऊस हा सर्वत्र ठिकाणी राहणार नाही. तुरळ ठिकाणी पडेलं याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी.
सोबतच या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र विभागात आणि कोकणात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय ?
हवामान खात्याने सुद्धा आगामी 48 तास राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आय एम डी ने बंगालच्या खाडीत तयार झालेल्या चक्रीवादळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला आहे.
आज विदर्भातील भंडारा चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार, असा अंदाज आहे. याशिवाय उद्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडणार, असे आव्हानं पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांना आर्थिक सावध आणि सतर्क राहणे चांगले आहे.