Weather Forecast : या ठिकाणी होणार गारपीट, जाणून घ्या माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Forecast : राज्यामध्ये अवकाळी पावसाला सुरू झालेली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, नगर मधील पारनेर आणि नाशिक मधील चांदवड, निफाड, येवला, सिन्नर या तालुक्यामध्ये रविवारी गारपिटीचा फटका बसला आहे. गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिके भाजीपाल्यांसह द्राक्ष डाळिंब पपई बागांना सुद्धा मोठा फटका बसलेला आहे.

आज सोमवारी पश्चिम विदर्भात गारपीट होण्याचा तर वरळीत महाराष्ट्र हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई पिकांसह भाजीपाल्याचे पिके आणि द्राक्ष डाळिंब पपई केळी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.

आंबेगाव मध्ये गारांचा खच पडला होता. नाशिकमध्ये गारपिटीसह सतत धार सुरू होती. सतत धार पावसामुळे द्राक्ष बागांमध्ये फळकुज आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव व होण्याचा धोका आहे. डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव पडण्याची भीती आहे. पपई आणि केळीला गारांचा मारा लागून पिके खराब झालेले आहेत.

सातारा आणि परिसरामध्ये शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. साताराशहर, वाई, जावली, महाबळेश्वर, पंचगणी व उत्तर साताऱ्यात पश्चिम भागात विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झालेला आहे. या पावसाने सातारा शहरांमध्ये सर्वत्र पाणी साठले होते. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झालेले आहे.

सध्या भात काढणी सुरू असून काढून ठेवलेला भात भिजल्यामुळे काळा पडण्याचा धोका आहे .वाई आणि महाबळेश्वर परिसरातील स्ट्रॉबेरी पिकांचे सुद्धा नुकसान झालेले आहे. रविवारी कोकण कोल्हापूर सांगली सातारा नगर नाशिक सह उत्तर महाराष्ट्र मध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालेली होते.

रब्बी साठी पाऊस पोषक

गारपीट आणि अवकाळी पाऊस द्राक्ष, डाळिंब, केळी, पपई, पेरू, स्टोबेरी या फळांसाठी नुकसानकारक आहे. राज्यांमध्ये फळबागांसाठी क्षेत्र मोठे असल्यामुळे मोठ्या नुकसानाची भीती आहे. पण हा पाऊस रब्बी हंगामातील पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. रब्बीतील गहू, ज्वारी, हरभरा, कर्डई पिकांच्या वाढीसाठी पोषक स्थिती निर्माण होणार आहे. पाण्याअभावी अडचणीत आलेल्या कोड व पिकांना संजीवनी मिळणार आहे.

ऑरेंज अलर्ट – अकोला, बुलढाणा, वाशिम ( पाऊस व गारपीट होण्याची शक्यता)

येलो अलर्ट – पालघर, ठाणे, रायगड, जळगाव, नगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा , सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ ( येथे हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता)

Leave a Comment