Vivek Bindra: काय आहे? विवेक बिंद्रा वाद, हि आहे त्याची खरी कहाणी पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vivek Bindra : सध्या सोशल मीडिया वरती चर्चेचा विषय ठरले ते म्हणजे विवेक बिंद्रा वाद तर तुम्हाला तर माहीतच आहे, विवेक बिंद्रा कोण आहे. देशातील एक प्रेरक वक्ता विवेक बिंद्रा अशी त्यांची ओळख आहे. काही दिवसापूर्वी विवेक बिंद्रावर संदीप माहेश्वरी यांनी एक मोठा स्कॅन केल्याचा आरोप केलेला होता. व त्यानंतर आता आणखी याच्यामध्ये अडचणीची वाढ झालेली दिसून येत आहे.

त्याचे कारण म्हणजे त्यांच्या धर्म पत्नीने हल्ला केल्याचा आरोप त्यांच्यावरती केलेला आहे. संदीप माहेश्वरी यांनी बिंद्रा यांच्यावर पाचशे कोटींचा घोटाळा केल्याचा असल्याचा आरोप लावलेला आहे यामुळे घोटाळाबाबत त्यांना प्रश्न विचारले जात होते दरम्यान आज आम्ही तुम्हाला विवेक बिंद्रा संबंधित अशाच एका वादग्रस्ताची माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया हा वाद काय आहे ?

हे पण वाचा : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी इथे क्लिक रा

सध्या सोशल मीडिया वरती चर्चेचा विषय ठरलेले विवेक बिंद्रावर त्यांच्या मेहुण्याने गुन्हा दाखल केला आहे सध्या त्यांच्या पत्नीवर झालेल्या मारहाणीचा आरोपाचा तपास सुरू आहे. त्या आधारे आता योग्य ती कारवाई केली जाणार आहे. बिंद्राची पत्नी यानिकाच्या भावाने याने 14 डिसेंबरला नोएडातील सेक्टर 126 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार विवेक बिंद्रा आणि यानिका चे सहा डिसेंबर रोजी लग्न झाले होते. दरम्यान लग्न झाल्यानंतर एका महिन्याने त्याच्या पत्नीवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे याबाबत एफआयआर देखील दाखल झालेली आहे.

यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, लग्नाच्या काही तासानंतर विवेक बिंद्राने यनिकाला खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला आहे. बिंद्राणे पत्नीचे केस ओढून मारहाण केल्याचा आरोप आहे. मराठी मुळे यांनी त्याचे कानाचा पडदा फाटला असून, तिला नीट ऐकू येत नाहीये पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफ आय आर मध्ये बिंद्रा ने यानिका चा फोन तोडला असल्याचे सांगितले गेले आहे.

मारहाणाच्या आरोपाधी युट्युब वर संदीप माहेश्वरी यांनी काही गंभीर आरोप केले आहे मोटिवेशनल स्पीकर संदीप महेश्वरी यांनी विवेक बिंद्रा यांच्यावर घोटाळ्याचे रॅकेट चालवण्याचा आरोप केला आहे. यामुळे तेव्हापासूनच सोशल मीडियावर बिंद्रा चर्चेचा विषय बनले आहेत. महेश्वरी नुकताच बिग स्कॅम एक्सपोर्ट नावाचा एक व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब चैनल वरती प्रसिद्ध केलेला होता.

यामध्ये त्यांनी बिंद्रावर मल्टी लेवल मार्केटिंग सारखा कोर्स चालवण्याचा आरोप होता. हा एक प्रकारचा घोटाळा असल्याचा दावा माहेश्वरी करून करण्यात आलेला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्याकडून शिकवणी व्यवसायाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे आकारले जात असल्याचे बोलले जात होते. दरम्यान हा घोटाळा तब्बल 500 कोटी रुपयांचा असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे बिंद्राने माहेश्वरीला कोणतेही प्रकार झाले नसल्याचे सांगितले आहे. याच कारणामुळे विवेक बिंद्रा चर्चेचा विषय बनलेले आहेत.

Leave a Comment