घरबसल्या शेतजमिनीवर वारसाची नोंदणी कशी करावी? कोणती कागदपत्रे आवश्यक? जाणून घ्या सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Varsa Nond : ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना शेतजमिनीच्या वारसा हक्काची प्रक्रिया अजूनही पूर्णपणे माहीत नाही. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या जमिनीवर वारसाची नोंद करण्यासाठी महसूल कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. पण आता काळ बदलला आहे महाराष्ट्र शासनाने ई हक्क प्रणाली मुळे ही किचकट प्रक्रिया आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येणार आहे. यामुळे तुमचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचणार आहे.

ई हक्क प्रणाली काय आहे?

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने सुरू केलेली ई हक्क प्रणाली शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. bhulekh.mahabhumi.gov.in या पोर्टलवर तुम्ही सात ते आठ प्रकारचे फेरफार अर्ज सादर करू शकता. यात केवळ वारसा नोंदीचे नाही तर नाव दुरुस्ती जमिनीवरील वजन चढवणे किंवा कमी करणे आणि ई करार करणे अशा अनेक सेवा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे तुमच्या अर्जाची स्थिती देखील तुम्ही ऑनलाईन तपासू शकता. Varsa Nond

वारसा नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या ब्राउझर मध्ये bhulekh.mahabhumi.gov.in ही वेबसाईट उघडा.
  • होम पेजवर तुम्हाला सातबारा दुरुस्तीसाठी ई हक्क प्रणाली अशी लिंक दिसेल यावर क्लिक करा.
  • आता public data entry पेज उघडेल येथे proceed to login या पर्यायावर क्लिक करा.
  • जर तुमचे यापूर्वी खाते नसेल तर create new user यावर क्लिक करा. येथे तुमचे नाव username पासवर्ड मोबाईल नंबर ईमेल आयडी पत्ता आणि पिन कोड अशी सर्व माहिती भरा.
  • खाते तयार झाल्यानंतर तुमच्या username आणि पासवर्ड ने लॉग इन करा.
  • लॉग इन केल्यानंतर मुख्य पेजवर सातबारा mutations या पर्यावर क्लिक करा.
  • अर्जदार प्रकारात citizen हा पर्याय निवडा.
  • पुढे जा process या पर्यायावर क्लिक करा आता फेरफार अर्ज ची पेज उघडेल.

हे पण वाचा | तुरीच्या दरात वाढ होणार का नाही? सध्या किती मिळतोय दर? वाचा सविस्तर

  • फेरफार अर्जाचे पेज उघडल्यानंतर तुम्हाला संबंधित जिल्हा तालुका आणि गावाचे नाव निवडायचे आहे.
  • त्यानंतर वारसा नोंद हा फेरफार प्रकार निवडा.
  • अर्जदाराची संपूर्ण माहिती भरा.
  • ज्या व्यक्तीचे निधन झाले आहे त्यांचे नाव आणि खाते क्रमांक टाका.
  • खातेदार शोधा या पर्यावर क्लिक करा आणि योग्य गट क्रमांक निवडा.
  • संबंधित व्यक्तीच्या मृत्यूची तारीख अचूक भरा.
  • जर तुम्ही स्वतः वारसा पैकी आहात तर होय निवडा नसल्यास नाही निवडा.
  • आता सर्व वारसाची सविस्तर माहिती भरा. यामध्ये नाव जन्मतारीख नाते मोबाईल नंबर आणि पत्ता यासारख्या सर्व गोष्टी अचूक भरा. सर्व वारसाची नावे भरल्यानंतर पुढे जा या बटणावर क्लिक करा.

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

  • मयत व्यक्तीचा ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेकडून मिळालेला मृत्यू दाखला.
  • कुटुंबातील सदस्यांची माहिती असलेले रेशन कार्ड.
  • जमिनीच्या मालकीशी संबंधित आठ अ उतारा
  • सर्व वारसाची माहिती स्पष्टपणे नमूद केलेले शपथ पत्र.

वरील सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर फाईल अपलोड झाल्याचा संदेश मिळेल. त्यानंतर स्वयंघोषणापत्र वाचून agree या पर्यावर क्लिक करा. तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट होईल आणि तो तलाठी कार्यालयाकडे पुढील पाडताळणीसाठी पाठवला जाईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद केली जाईल.

एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा नॉमिनी आणि वारस हक्क या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बँकेत किंवा विमा पॉलिसीमध्ये नॉमिनीला रक्कम मिळू शकते परंतु मालमत्तेचा वारसा हक्क सिद्ध करण्यासाठी वारस हक्क प्रमाणपत्र असणे आवश्यक असते. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सोपी असली तरी सर्व माहिती काळजीपूर्वक आणि अचूक भरा. कोणतीही चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. ज्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे आणि सर्व माहिती तपासून घ्या. या माहितीमुळे तुम्हाला घरबसल्या शेत जमिनीवर वारसा नोंदणी कशी करायची याची स्पष्ट कल्पना आली असेल अशी अपेक्षा आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!