Friday

14-03-2025 Vol 19

गुड न्यूज ! महाराष्ट्राला आणखीन एक वंदे भारत, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार, उद्घाटन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande Bharat express : वंदे भारत एक्सप्रेस ही देशात चांगलीच लोकप्रिय झालेली आहे विविध राज्यातूनही एक्सप्रेस सोडण्याची मागणी वाढत आहे महाराष्ट्रातून आतापर्यंत पाच वंदे भारत एक्सप्रेस सावंत होत्या आता सहावी ट्रेन मिळाली आहे येत्या 30 तारखेपासून ही गाडी चालवण्यास सुरुवात होणार आहे.

देशभरात आकर्षक लोक आणि आपल्या वेगवेगळ्या लोकांच्या मनामध्ये वेगामुळे लोकप्रिय झालेले वंदे भारत रेल्वे महाराष्ट्रातून पाच ठिकाणी सध्या धावत आहे आता महाराष्ट्र राज्याला सहावी रेल्वे मिळाली आहे वंदे भारत लवकरच मराठवाड्यातून धावणार आहे मध्य रेल्वे ला वंदे भारतचे रँक मिळाले असून मुंबई येथे जालना दरम्यान ही रेल्वे धावणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या रेल्वेला 30 डिसेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहे. वंदे भारत रेल्वे अयोध्या-आनंद विहार, नवी दिल्ली-वैष्णव देवी, अमृतसर-नवी दिल्ली, जालना-मुंबई आणि कोइंबतूर-बंगळुरु येत्या 30 तारखेपासून धावणार आहे तसेच तंत्रज्ञान असलेली अमृतसर भारत नावाच्या दोन रेल्वे देशात प्रथमच धावणार आहेत.

महाराष्ट्राला मिळाले सहावी रेल्वे

महाराष्ट्रात पहिले वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते गांधीनगर येथे सुरू झाली होती सहा दिवस धावणारी या रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर मुंबई ते सोलापूर मुंबई ते साईनगर शिर्डी मुंबई ते गोवा आणि नागपूर ते बिलासपूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या 30 डिसेंबर पासून मुंबई ते जालना ही रेल्वे सुरू होणार आहे प्रवासाचा कमी वेळ चांगल्या सुविधा आणि वाजवी भाडे यामुळे विमान प्रवाशापेक्षा अनेक जण वंदे भारत एक्सप्रेसला प्राधान्य देत आहे.

अमृत भारत रेल्वे प्रथमच दाखवणार

अमृत भारत रेल्वे नवी दिल्ली ते दरभंगा दरम्यान धावणार आहे. तसेच दुसरी गाडी मालंदा-बंगळुरू दरम्यान चालवण्यात येणार आहे. श्रमिक कामगारांना लक्षात ठेवून ही गाडी सुरू केली आहे. या रेल्वे उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात, व महाराष्ट्र या राज्यातून सुरू करण्यात येणार आहे. तसेच अमृत-भारत रेल्वे एस सी 1,2,3,कोच असलेली धावणार आहे. राजधानी शताब्दी एक्सप्रेस प्रमाणे या गाडीचा वेग जास्तीत जास्त 130 किमी असून, बोलतोस तंत्रज्ञान असल्यामुळे राजधानी शताब्दी पेक्षा अधिक वेग या गाडीचा असणार आहे. अमृत भारत ट्रेनचा तिकीट दर सामान्य रेल्वे पेक्षा 10 ते 15 टक्के अधिक असणार आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *