Tur Rate | मागच्या काही दिवसांपासून तुझ्या बाजारभावामध्ये सातत्याने चढउतार होत आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला तुरीने अकरा हजाराचा टप्पा पार केला होता. परंतु अचानक तुरीच्या दरामध्ये घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा जनक परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या बाजार समितीमध्ये तुरीला काय दर मिळतो हे आपण जाणून घेणार आहोत.
सिल्लोड बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात तुरीच्या दरात थोडीशी घसरण दिसून आली आहे. येथे पाच कुंटल तुरीची आवक झाली असून कमीत कमी दर 9हजार 100 ते जास्तीत जास्त नऊ हजार तीनशे रुपये इतका दर मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.
जळकोट बाजार समितीमध्ये तुरीची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. येथे 452 क्विंटल तुरीची आवक झाली असून कमीत कमी 9955 रुपये इतका दर मिळाला आहे. तर जास्तीत जास्त दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये इतका दर मिळाला असून तसेच सर्वसाधारण दहा हजार दोनशे पन्नास इतका दर मिळाला आहे.
समुद्रपूर बाजार समितीमध्ये तीन क्विंटल तुरीच्या आवक झाली असून कमीत कमी 9000 ते जास्तीत जास्त नऊ हजार तसेच सर्वसाधारण हजार रुपये इतका दर मिळाला आहे.
तसेच शेवगाव बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटल तुरीची आवक झाली असून येथे कमीत कमी नऊ हजार पन्नास ते जास्तीत जास्त नऊ हजार तीनशे रुपये इतका दर मिळाला आहे. तसेच सर्व साधारण नऊ हजार तीनशे रुपये इतका दर मिळाला आहे.
काल झालेल्या लिलावामध्ये तुरीच्या दरात कुठेही वाढ दिसून आलेली नाही. परंतु येत्या काळामध्ये तुरीचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. आता याच्याकडे पाहण्यासारखे राहणार आहे की येथे काळात तुरीला काय दर मिळतो. पुन्हा एकदा तुरीचे दर 12 हजार पार जातील का हे महत्वाचे राहणार आहे.