Friday

14-03-2025 Vol 19

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तुरीच्या दारात मोठी घसरण; पहा आजचे बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TUR RATE | गेले काही दिवसापासून तुरीचा तोरा चांगला चमकत होता. कापसाने जरी शेतकऱ्यांना निराशा दिली असली तरी, तुरीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत होते. अनेक बाजार समितीमध्ये तुरीला 12 हजाराच्या पुढे भाव मिळत होता. परंतु तुझ्या घरामध्ये अचानक घसरल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तूर विक्री बाबत संभ्रम निर्माण होत आहे. याचमुळे आपण आजचे बाजार भाव जाणून घेणार आहोत.Today’s Tur market

काल झालेल्या लिलावामध्ये सोलापूर येथील दुधनि बाजार समितीमध्ये 505 क्विंटल झालेली आहे. तसेच तिथे जास्तीत जास्त दहा हजार दोनशे पंचावन्न ते कमीतकमी नऊ हजार सातशे रुपये इतका दर मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण दहा हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.

तसेच धाराशिव येथील मुरूम बाजार समितीमध्ये 330 क्विंटल तुरीच्या झाले आहे येथे जास्तीत जास्त दहा हजार दोनशे ते कमीत कमी 9 हजार पाचशे रुपये इतका दर मिळाला आहे तसेच सर्वसाधारण 9850 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

यवतमाळ येथील कळंब तालुक्यामध्ये असलेले बाजार समितीत 160 क्विंटल तुरीची आवक झाली आहे. येथे जास्तीत जास्त दहा हजार शंभर ते कमीत कमी नऊ हजार सातशे पन्नास रुपये तसेच सर्वसाधारण हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला आहे.

तुरीच्या दारात अचानक मोठी घसरण

मागील आठवड्यामध्ये काही निवडक बाजार समितीमध्ये जवळपास सर्वच बाजार समितीचे दर दहा हजार रुपयांच्या वरती गेले होते. मात्र आज असलेल्या बाजार समितीमध्ये बाकी सर्व बाजार समितीचे दहा हजारांच्या खाली घसरले आहेत. मागील तीन ते चार दिवसांपूर्वी तुरीचे दर वाढत असताना मात्र अचानक घसरण झाली. त्यामुळे आता इंदूर काढणे हंगामात दरात आणखी घसरण झाल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी वाढ होऊ शकते.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *