Tur Rate | तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कापसाला जरी योग भाव मिळत नसला तरी तुरीने आता शेतकऱ्यांना धीर दिला आहे. गेला काही दिवसांपासून हवामानामध्ये बदल होत आहे. यंदा राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांवरती मोठे संकट कोसळले आहे. अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस त्यांच्या घरामध्ये साठवून ठेवले आहे.
राज्यामध्ये सरसरी पाऊस कमी झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर सर्वच पिकाच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे. तसेच बाजारामध्ये शेतकऱ्यांना आधार मिळत नाही. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी चिंताअतूर झाला आहे. अनेक बाजार समितीमध्ये सोयाबीन व कापूस पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना हमीभाव अपेक्षा कमी दरामध्ये त्यांचा माल विकावा लागत आहे.
शेतीला केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्गातून मोठी चिंता व्यक्त होत आहे. मायबाप सरकार शेती कशी करावी असा प्रश्न शेतकरी सरकार समोर मांडत आहेत. येत्या काळामध्ये अशीच परिस्थिती जर राहिली तर शेतकरी कर्जबाजारी होतील. बळीराजाला धीर देणे गरजेचे आहे. असे कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचे मत व्यक्त होत आहे.
अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना योग्य असा न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. शेतकरी कर्जबाजारी झाल्या मुळे शेतकरी वर्ग टोकाचा पाऊल उचलतात. परंतु तूर बाजारामध्ये तुरीला चांगला भाव मिळत आहे. तुर उत्पादनामध्ये मोठी घट झाली तरी वाढत असलेली मागणी यामुळे तुर बाजारामध्ये सुधारणा होत आहे.
काही दिवसापूर्वी तुरीचे भाव दहा हजारांचा टप्पा पार केला होता. परंतु काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा किंचित तुरीचे भाव कमी झाले होते. आता मात्र पुन्हा एकदा बाजार भाव सुधारणा होत आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुरीचे उत्पादन कमी आणि वाढलेली मागणी व तसेच शासन खुल्या बाजार भावाने तूर खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय यामुळे तुर बाजार भाव मध्ये वाढ झाली असल्याची मते जाणकारांनी व्यक्त केली आहे.
दोन फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावात राज्यातील एका मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीने चक्क साडेदहा हजारांचा टप्पा पार केला आहे.
या बाजार समितीमध्ये तुरीला मिळाला विक्रमी दर
मिळालेल्या माहितीनुसार 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावामध्ये सोलापूर येथील करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला विक्रमी दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये तुरीचे दर दिवसान दिवस वाढत चालले आहेत.
शुक्रवारी झालेल्या लिलावामध्ये तुरीने चक्क दहा हजार पाचशे इतका उंचांक दर मिळाला आहे. या मार्केटमध्ये सध्या तुरीचे दररोज सर्वसाधारणपणे पाचशे कट्ट्यांच्या घरात आवक होत आहे. सध्या बाजारामध्ये वाढ झालेली मागणी व बाजारभाव चांगली मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे उत्पादन मध्ये आलेली घट भरून काढेल अशी आशा शेतकरी वर्ग मधून व्यक्त होत आहे.