TUR RATE | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तुरीला मिळणारं 12 हजार भाव? वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TUR RATE | सध्या बाजारामध्ये नवीन तुरीची आवक सुरू आहे. तरीही बाजार भाव मध्ये तेजी दिसून येत आहे. अशा मध्येच काही बाजार समितीमध्ये तुरीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. दोन आठवड्यानंतर यामध्ये वाळवायची शक्यता असली तरी दरावर फारशी काही परिणाम होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे यंदा तूरडाळी चे दर देखील सुधारण्याचे संकेत आहेत.

(शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp 70571 47283 नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा)

यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दांडी मारली. त्यामुळे खरीप हंगामा मधील पिकाची लागवड उशिरा झाली. व त्यानंतर मध्ये काळामध्ये काही भागात संत धार पाऊस तर काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेला पावसामुळे तुर पिकावर मोठा फटका बसला.

यामुळे तुर उत्पादनामध्ये मोठी घट दिसून आली आहे. या कारणामुळे डाळीवर ही परिणाम होण्याचे संकेत आहेत. सरकारने जाहीर केलेला हमीभाव पेक्षाही अधिक तुरीला दर मिळत आहे. सरकारने पुढील सात हजार रुपये इतका हमीभाव जाहीर केला आहे.

सध्या बाजारामध्ये नवीन तुरीच्या होत असताना, तुरीच्या व्यवहारात नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल इतका दर मिळत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तुरीचे दर दहा हजारांच्या पार पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp 70571 47283 नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा)

यंदा सरकारच्या माध्यमातून बारदार भावानुसार तूर खरेदी करण्यात येणार असल्याने, तुरीच्या दरामध्ये घट होण्याची शक्यता कमी असल्याचा दावा केला जात आहे. तज्ञांच्या मते तुरीला बारा हजारांपेक्षा अधिकचा दर मिळणार आहे.

सध्या बाजारामध्ये आवक कमी झाली आहे. नविन तुरीची काही अंशी आवक होत असली तरी ती समाधानकारक नाही. दोन आठवड्यात आवक वाढल्यास या दारात काही अंश सुधारणा होईल आणि ते किंचित कमी होतील. नवीन तुरीची आवक झाली तरी किमती फार कमी होणार नाहीत असे सांगितले जात आहे.

सध्या सरकारकडून हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी केली जात आहे. परंतु बाजारात दर जास्त असल्याने या नोंदणीला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. परंतु येत्या काळामध्ये तुरीचे भाव बारा हजारांच्या पार जातील का याकडे पाहणे विशेष राहणार आहे.

Leave a Comment