Tur Rate | कापसाने जरी नाराज केली असली तरी तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची व दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्यामध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने कापसासह तुर उत्पादनात मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली आहे. यामुळे तुरीला चांगला दर मिळत आहे. परंतु कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी कायम आहे. 2023 च्या शेवटी तुरीला दहा हजारच्या आसपास दर मिळत होता. व तेव्हापासून बाजारामध्ये सातत्याने घसरण सुरू होती.
(शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp 70571 47283 नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा)
कापसालाही चांगला दर मिळत नसल्याने, आणि शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने शेतकऱ्यांनी नवीन तूर बाजारामध्ये आल्यानंतर ही तुरीच्या दरामध्ये वाढ झाली नव्हती. यंदा फारसे असे उत्पादन झाले नसले तरीही भाव दाबावत होते. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत होते.
अपेक्षित असा पाऊस नाही दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली, कमी उत्पादन कमी भाव आणि जास्त खर्च यामुळे शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवणार का अशी भीती शेतकऱ्यांना सातत्याने सतावत होती. परंतु नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळालेली आहे.
जरी कापसाला कमी दर असला तरी तुर बाजारामध्ये तेजीचे संकेत मिळू लागले आहेत. जानेवारी चे काही दिवस उलटल्यानंतर तुरीच्या बाजारभावामध्ये वाढ होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसात तुरीचे भाव दाबावत होते परंतु नाहीसे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता तुरीचे बाजार भाव वाढू लागले आहेत.
काही बाजार समितीमध्ये तुरीच्या भावाने दहा हजाराचा टप्पा पार केला आहे. येत्या काही काळामध्ये तुरीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. परंतु आता आगामी काळामध्ये ही तेजी कायम राहणार का याकडे पाहण्यासारखे राहणार आहे. तज्ञांचे मते बाजार भाव आणखी वाढतील आणि तुरीचे भाव 12 हजारांच्या पार जातील.