Thursday

13-03-2025 Vol 19

तुरीच्या भावामध्ये झाली इतक्या रुपयांनी वाढ ! | Tur Market Update

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Market Update : तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तुरीच्या बाजारातील नरमाई थांबली आहे. देशातील बाजारात तुरीला सरासरी काही बाजारात भाव वाढलेला दिसून येत आहे. बाजारातील सध्याची तुरीची आवक सरासरी पेक्षा कमी झाली सरकार बाजारभावाने तुरीची खरेदी करणार असल्याने शेतकरी विक्रीसाठी थांबलेली दिसून येत आहे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp 70571 47283 नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा

त्यामुळे तुरीच्या भावाला देखील आता आधार मिळाला आहे. सध्या बाजारामध्ये तुरीला सरासरी भाव सात हजार सातशे ते आठ हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान मिळत आहे. यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने व नोव्हेंबर मध्ये अवकाळी पावसामुळे तुरीचे उत्पादनामध्ये घट झालेली आहे.

सरकार ही बाजारभावाने खरेदीत उतरत असल्याने तुरीच्या बाजाराला चांगला आधार मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तुरीसाठी चांगला भाव मिळू शकतो असे अभ्यासकांनी सांगितले आहे.

परंतु शेतकऱ्याचे पांढरे सोने दबाव मध्ये आहे. बाजारामध्ये कापसाचे आवक वाढलेले असतानाही कापसाचे भाव कमीच आहेत. सध्या कापसाचे भाव सरासरी सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपये दरम्यान आहेत. तर बाजारातील आवक जवळपास एक लाख 80 हजार गाठींची दरम्यान राहिली आहे.

सर्वाधिक आवक महाराष्ट्रातील बाजारात झाली आहे जवळपास 45 ते 50 लाख गाडी कापूस आला होता. तर तेलंगणा 40 हजारांचा दरम्यान आणि गुजरात मधील पस्तीस हजार गाठींच्या दरम्यान कापूस बाजारामध्ये विक्रीसाठी येत आहे. असे व्यापारी आणि उद्योजकांनी सांगितले आहे. बाजारातील आवक जास्त आहे तोपर्यंत दरावरील दबाव कायम राहू शकतो. असा अंदाज वर्तवला जात आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *