Tur Market Price | तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर या वर्षी पावसाने तुरीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केले आहे. त्यामुळे तुर उत्पादनामध्ये मोठी घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाच्या लहरीपणामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनामध्ये घट आले असल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.
परंतु तू उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून बाजारभावाने 8 ते 10 लाख टन तूर खरेदी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बाजार अभ्यासकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांमध्ये तूर अकरा हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकरी तूर विकण्याची घाई न केलीच बरी राहणार आहे.
दुसरीकडे बाजार भाव देखील दाबावत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी बाजारात तुला दहा हजार पर्यंत भाव मिळत होता. पण सध्याच्या घडीला तुरीला खूपच कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेमध्ये दिसून येत आहे. सध्या बाजारामध्ये तुरीला कमाल नऊ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे.
केंद्र सरकार तुर खरेदी करणार या कारणामुळे तुरीचे भाव वाढतील अशी आशा आहे. केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसी एफ या दोन माध्यमातून खुल्या बाजारातील बाजारभाव लातूर खरेदी करण्याचे संकेत दिले आहेत.
केंद्र सरकारने तुरीला यंदा सात हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला होता. जाहीर केलेले हमीभावापेक्षा अधिकच्या दारात केंद्र सरकार तूर खरेदी करेल अशी अपेक्षा आहे. नाफेड कडून बाजारभावात तुरीची खरेदी होणार असून यासाठी नापेड रोज नवीन बाजार भाव जाहीर करणार आहे.
याच कारणामुळे व्यापारी आणि तूर बाजारातील तज्ञांनी लवकरच तुरीचे भाव 11 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत जातील अशी आशा व्यक्त केली आहे. येत्या काळामध्ये तुरीच्या बाजार भाव दोन हजार पर्यंत वाढवण्याची शक्यता बाजार अभ्यासकांनी वर्तवली आहे. आता हा अंदाज खरा ठरतो का याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.