Today Cotton Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कापसाच्या दरात विक्रमी वाढ पाहायला मिळत आहे. कापूस ए महाराष्ट्र सहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक प्रमुख पीक आहे. या पिकाची संपूर्ण राज्यभर लागवड केली जाते. राज्यात विदर्भ व मराठवाडा आणि खानदेश या भागातील बहुतांश शेतकरी या पिकावर अवलंबून आहेत.
या दरम्यान राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी गुड न्यूज समोर आली आहे. कापसाच्या बाजारभावात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढ नमूद करण्यात आली आहे. यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसात कापसाचे दर खूप कमी होते यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हजारो रुपयांची नुकसान झाले.
शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील उत्पादनातून भरून काढता येत नव्हता. अशा परिस्थितीत बाजारभाव सुधारणा होणे खूप महत्त्वाचे होते. शेतकऱ्यांच्या कापूस पिकाला योग्य तो हमीभाव मिळावा अशी इच्छा सर्व शेतकऱ्यांची होती. Today Cotton Rate
दरम्यान राज्यातील परभणी जिल्ह्यातील काही कृषी उत्पादक बाजार समितीमध्ये कापसाचे भाव 1000 रुपये प्रतिक्विंटल ते 1200 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत वाढले आहेत. वाढता बाजार भाव पाहता कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पहायला मिळत आहे.
कुठे मिळाला सर्वोच्च भाव?
शेतकरी मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील परभणी जिल्ह्यात शेलु कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल अर्थातच 3 मार्च 2024 ला झालेल्या लिलावात कापसाला 6500 ते 8080 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये कापसाला 7290 रुपये प्रतिक्विंटल असा सरासरी दर मिळाला आहे.
या मार्केटमध्ये काल पावसात भिजलेला कापसाला प्रतिक्विंटल कमीत कमी 6500 ते जास्तीत जास्त 7700 रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव मिळाला आहे. त्याचबरोबर न भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल कमीत कमी 7900 ते जास्तीत जास्त 8080 रुपये तर सरासरी 8040 रुपये दर मिळाला असल्याची माहिती बाजार प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून तुलना केले असता कालचे बाजार भाव समाधानकारक होते. या बाजारात कापसाच्या बाजारभावात काल 1000 ते 1200 रुपये प्रतिक्विंटल अशी वाढ नमूद करण्यात आली आहे. यामुळे आता शेतकरयांना आगामी काळात बाजारभावात आणखी वाढ होऊ शकते आशी अश्या वाटू लागली आहे.
हे पण वाचा:- राज्यातील 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 26500 हेक्टर सोयाबीन पीक विम्याचे वाटप, पहा पात्र शेतकऱ्यांची यादी
1 thought on “गुड न्यूज कापसाच्या बाजारभावात 1000 ते 1200 रुपये प्रति क्विंटलची वाढ, पहा कुठे मिळत आहे सर्वोच्च भाव?”