Teacher Recruitment Advertisement 2023 | राज्यात होणार 30 हजार पदांची भरती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Teacher Recruitment Advertisement 2023 : राज्यात लवकरच शिक्षण भरती सुरू होणार आहे शिक्षक वाट बघत बसलेल्या उमेदवारांसाठी उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे बातमी आहे. या भरतीचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे परंतु अर्ज सुरू कधी होणार आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. ( Maharashtra teacher requirement 2023)

Maharashtra Teacher Requirement 2023 : राज्यामध्ये साठ हजार पेक्षा शिक्षकांची पदर रिक्त आहेत. भरतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये तीस हजार पदांची शिक्षक भरती होणार आहे. 15 ऑगस्ट पासून पवित्र पोर्टल सुरू होणार असल्याची घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यामंडळीच्या अधिवेशनादरम्यान केली होती.

Maharashtra Teacher Requirement 2023 शिक्षण मंत्री केसरकर यांनी या भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले होते परंतु अजूनही पोर्टल सुरू झाली नसल्याची वस्तुस्थिती आहे व तसेच जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या बिंदा नामावलीचा घोळ अद्याप सुरूच आहे. सन 2017 पासून शिक्षकांचे पदे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पाच वर्षानंतर शिक्षक अभियोग्यता परीक्षा घेतली आहे. या परीक्षेचा निकाल लागून आता तब्बल पाच महिने झाले आहेत. तरी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही त्यातच शिक्षक भरतीचे दोन टप्प्यात करण्याचा निर्णय राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर केले होते तसेच 15 ऑगस्ट पासून पोर्टल सुरू होईल असे त्यांनी त्यावेळेस सांगितले होते मात्र आता 20 ऑगस्ट वरून गेले तरी भरतीचे पोर्टल सुरू झाले नाही शिक्षक भरतीच्या प्रात्यक्षिक असलेल्या उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट पसरली आहे.

नोंदणी प्रक्रिया

पवित्र पोर्टलवर उमेदवाराची नोंद अद्याप सुरू झालेली नाही. या भरतीसाठी तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त उमेदवार नोंदणी करणार आहेत. तसेच नोंदणी करण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे लवकरात लवकर शासनाने नोंदणी प्रक्रिया सुरू करावी अशी उमेदवारांकडून मागणी होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!