Sugarcane Workers | राज्यातील ऊसतोड कामगारा बाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र मध्ये ऊसतोड कामगारांची संख्या प्रामुख्याने मोठी आहे. ऊसतोड कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी घर दार उघड्यावर टाकून ऊसतोड करत असतात. परंतु ऊसतोड काम करत असताना किंवा अपघाती मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या कुटुंबामध्ये मोठ्या अडचणीत वाढ होते.
ज्यामुळे ऊसतोड कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. अशा राज्यातील एकूण 67 ऊसतोड कामगाराच्या कुटुंबा वारसांना पाच लाख रुपये याप्रमाणे तीन कोटी 35 लाख रुपये वितरित करण्यात राज्य सरकारकडून मंजूर देण्यात आली आहे.
ऊसतोड कामगारांना मिळणार तीन कोटी 35 लाख रुपयांची मदत
राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने, पुणे जिल्ह्यातील तीन ऊसतोड कामगारांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांचे आर्थिक मदत निधी नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे.
तसेच राज्य सरकारने बीड जिल्ह्यातील 31 व जालना जिल्ह्यामधील तीन धाराशिव मधील साथ आणि अहमदनगर मधील 23 व पुणे तीन असे एकूण 67 प्रस्ताव करिता तीन कोटी 35 लाख रुपये संबंधित जिल्ह्यांना वर्ग केले आहेत. असे अजित पवार यांनी निधीचे वितरण करताना सांगितले आहे.
ऊसतोड कामगाराच्या वारसांना मिळणार पाच लाख रुपयांची मदत
राज्यामध्ये ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तसेच बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांमध्ये अपघात झालेली ऊसतोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगार म्हणून देखील ओळखले जाते. या बीड जिल्ह्यातील 31 ऊसतोड कामगारांचा अपघाती मृत्यू झाला आहे तसेच या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.