निवडणुकीदरम्यान साखरेच्या दरात वाढ..! पहा सध्या काय मिळतोय साखरेला भाव?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugar Price News: नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारकडून प्रत्येक महिन्याला साखरेचा कोटा ठरवला जात असतो. दरम्यान साखरेची निर्यात बंदी लागू करण्यात आली असल्याने जागतिक बाजारपेठेत साखरेच्या दरात घसरन होताना पाहायला मिळाली आहे. राष्ट्रीय बाजारात साखरेचे दर 75 रुपयांनी वाढून क्विंटल मागे 3900 ते 3950 रुपयावर पोहोचले आहे.

महाराष्ट्रातील साखरेचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्र सरकारकडून लग्नसराई आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा मे महिन्यातील साखरेचा कोटा वाढवला आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत दोन लाख टनाने साखरेचा कोटा वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारने मे महिन्यातील मागणीचा विचार करून सत्तावीस लाख टन साखरेचा भरपूर कोटा खुला केला आहे. परंतु साखरेचा खुला केलेल्या कोटाचा साखरेच्या बाजारभावात उलटा परिणाम होत्या ना दिसत आहे.

राष्ट्रीय बाजारात साखरेचा दर 75 रुपयांनी वाढला आहे. 3900 ते 3950 रुपये प्रति क्विंटल रुपयावर पोहोचला आहे. महिन्याच्या सुरुवातीचा आठवडा असल्याने बाजारात साखरेला मागणी चांगली असल्याने साखरेच्या बाजारात तेजी पाहायला मिळत असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. Sugar Price News

सोयाबीनचा भाव आणि आवक वाढली..! पहा आजचा सोयाबीन बाजार भाव

केंद्राने साखरेचा मुबलक कोटा जाहीर केल्याने खरंतर साखरेचे दर क्विंटलला पन्नास रुपयांनी कमी होण्याची अपेक्षा वर्तवन्यात येत होत्या. शिवाय देण्यात आलेल्या मुबलक कोटा इलेक्शन कोटा असल्याचे बोलले जात आहे. साखरेचे निघालेले टेंडर ही 3600 ते 3650 रुपये प्रतिक्विंटल च्या वर पोहोचले आहे. सट्टेबाजी सक्रियता हे त्यामागे कारण आहे असे सांगितले जाते.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत साखरेच्या दरातील तेजी हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे मागणी वाढल्यास तेजी कायम राहण्याचा अंदाज व्यापाऱ्याकडून वर्तवण्यात येत आहे. किमान विक्री दरवाढीच्या शक्यतेने बूस्टर केंद्र सरकारकडून साखरेचा किमान विक्री दर 3100 वरून 3500 रुपये प्रति क्विंटल किंवा त्यापेक्षा अधिक करण्याचा साखर उद्योगाची जुनी मागणी आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यावर काही ना काही सकारात्मक निर्णय घेण्याची चर्चा बाजारपेठेमध्ये सुरू आहे. त्याचा फायदा घेत सट्टेबाजांकडून साखरेची खरेदी वाढण्यास सुरुवात झाल्याने अनपेक्षित वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “निवडणुकीदरम्यान साखरेच्या दरात वाढ..! पहा सध्या काय मिळतोय साखरेला भाव?”

Leave a Comment

error: Content is protected !!