Subsidy on fertilizer : शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे आता राज्य सरकारने अलीकडेच शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे रासायनिक व तसेच सेंद्रिय खते आता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत सन 2023-24 पासून ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे या बाबी ऐवजी रासायनिक आणि सेंद्रिय खते देण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे अशी माहिती संदिपान भुमरे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी नुकतीच एक या मुलाखतीमध्ये देण्यात आलेली आहे. ( Subsidy on fertilizer )
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन उभारण्याकरिता अनुदान केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय योजना प्रती थेंब अधिक या योजनेमधून देण्यात येत होते तसेच इतर योजना मधून ठिबक सिंचन सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना होत असल्यामुळे ठिबक सिंचन द्वारे पाणी देणे भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजने मधून आता खते देणे ही बाब समाविष्ट करण्यात आलेली. आता शेतकऱ्यांना खतांवरती या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येणार आहे.
हे पण वाचा :- आता शेतकऱ्यांना कर्ज मिळणे झाले सोपे अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे
दिवंगत भाऊसाहेब फुंडकर राज्याचे माजी कृषिमंत्री यांच्या नावाने आता फलोत्पादन विभागाकडून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आलेली आहे जवळपास 15 पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ठिबक सिंचन फळबाग लागवड अंतर्गत अनुदान देण्यात येत असते.
आता ठिबक सिंचन ऐवजी शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे आवश्यक खतांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमधून शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे व तसेच यासाठी अर्थसंकल्पनामध्ये जवळपास शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
या योजनेमध्ये समाविष्ट पिके
सिताफळ, आवळा , चिंच, डाळिंब, काजू, पेरू, जांभूळ, चिकू ,नारळ, संत्रा, मोसंबी, अंबा, कागदी लिंबू, व तसेच अंजली या पिकांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे.