Thursday

13-03-2025 Vol 19

नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी ! ST मध्ये होणार Cashless व्यवहार; प्रवाशांना मोठा फायदा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ST NEWS : एस टी महामंडळ त्यांच्या प्रवासासाठी नेहमीच अनेक काही ना काही आकर्षक अशा सुविधा उपलब्ध करत असते. यात सुविधामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. एसटी बस ही सामान्य लोकांसाठी परवडणारी प्रवासाचे साधन आहे. म्हणूनच एस टी महामंडळ एसटीच्या सुविधा भर घालण्यासाठी रोकड विरहित सेवा उपलब्ध करून दिली आहे. तरीही सेवा कशी आहे ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा.

तुम्हाला तर माहित आहे सध्या डिजिटल चा जमाना सुरू आहे. या डिजिटलच्या जमाने मध्ये सर्व व्यवहार कॅशलेस होत आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाद्वारे नवीन अँड्रॉइड ETI मशीन सर्व आगारात कार्यान्वित करण्यात आले आहेत. सध्याच्या माहिती व तंत्रज्ञान युगात सर्वत्र रोकड विरहित व्यवहार करण्यात येत आहे त्यामुळे आता एसटीने हा मार्ग निवडला आहे.

एस टी महामंडळाने घेतलेला या निर्णयामुळे प्रवाशांचा व नागरिकांचा मोठा फायदा होणार आहे. एसटी बस मध्ये तुम्हाला यूपीआय क्यू आर कोड द्वारे पैसे भरता येणार आहेत. हा एसटीद्वारे करण्यात आलेला पहिला टप्पा आहे. तर याच्यापुढे टप्प्यात डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड द्वारे सुद्धा तुम्ही व्यवहार करू शकता. या नवीन निर्णय बाबत सर्व विभागीय कार्यालयांना सुचित करण्यात आलेले आहे. तसेच किंवा कोड वापरा संबंधित वाहकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी वाहकांची होणारी फजिती कुठेतरी कमी होईल आणि त्याचा फायदा प्रवाशांना होईल अशी अशा व्यक्त केली जात आहे.

अशा नवीन माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्की पुढे शेअर करा धन्यवाद

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *