SSC-HSC Hall Ticket Download | महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेचे प्रवेश पत्र ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध केले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता. mahahsscboard.in या साईट द्वारे प्रवेश पत्र डाउनलोड घेवें.
प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी मुख्याध्यापक यांना संस्थेचे लॉगिन विंडोमध्ये आवश्यक तपशील भरून घ्यायचे आहे. सर्व तपशील भरल्यानंतर प्रवेश पत्र डाउनलोड करता येणार आहे. व डाऊनलोड केल्यानंतर शाळा अधिकारी बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेचा स्टॅम्प केलेले प्रवेश पत्र वितरित करतील. व प्रवेश पत्र मध्ये काही बदल आढळल्यास विभागीय महामंडळांना कळविण्यात येईल. यामुळे प्रवेश पत्र मध्ये आपले नाव व आपली स्वाक्षरी तपासून घ्यावी.
बोर्डाचे वेळापत्रकानुसार, बारावी बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. व दहावी बोर्डाचे पेपर 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीमध्ये होणार आहे.
प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या सूचना चा वापर करावा :
- सर्वप्रथम तुम्ही mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
- यानंतर मुख्यपृष्ठावर उपलब्ध महाराष्ट्र SSC आणि HSC प्रवेश पत्र 2024 डाउनलोड असा पर्याय दिसेल तेथे क्लिक करा.
- आता तुम्हाला स्क्रीन वरती एक नवीन लॉगिन विंडो दिसेल.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला दिलेली सर्व तपशील योग्यरीत्या भरून घ्या.
- यानंतर तुम्हाला डाउनलोड प्रवेश पत्र असा ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमचे प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता.