दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! परीक्षेच्या वेळेमध्ये केला मोठा बदल


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC BOARD | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाकडून इयत्ता दहावी-बारावी परीक्षा वेळे संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी व बारावीची परीक्षा अगदी तोंडावर आली असून विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे , जाणून घ्या संपूर्ण माहिती.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा मध्ये अतिरिक्त 10 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. या निर्णयामुळे आता पेपर फुटी व कॉफी प्रमाण कमी होणार असल्याचं तज्ञांनी सांगितले आहे. मागील वर्षापर्यंत पेपर साठी तीन तासाचा वेळ देण्यात येत होता परंतु यंदा तो वेळ 3 तास 10 मिनिट असणार आहे.

या अगोदर बोर्डाच्या परीक्षेमध्ये दहा मिनिटे अतिरिक्त निर्धारित वेळेच्या आधी वाढवून दिला जात होती. जर 11 चा पेपर असेल तर 10:50 पासून सुरु व्हायचा. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आकलन करण्यासाठी हा वेळ वाढून दिला जात होता.

परंतु या कारणामुळे कॉपी प्रकरण समोर येण्याचे प्रमाण जास्त होते. अनेकदा पेपर फुटीच्या च्या बातम्या पसरत होत्या, या कारणामुळे आता महाराष्ट्र शिक्षण महामंडळाने पेपरचा कालावधी संपल्यानंतर निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिट अधिक वाढून देण्याचा निर्णय घेतला आहे.

परीक्षा केंद्रामध्ये या वेळेत उपस्थित राहायचे आदेश

परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहावे लागणार आहे. असे सूचना महाराष्ट्रा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने दिले आहेत. जे करणारे विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी करून त्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधीच उपस्थित राहायचे आहे.

दहावी बारावी बोर्ड परीक्षा कधी होणार

बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक नोव्हेंबर महिन्यामध्ये जाहीर करण्यात आले असून. बारावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 दरम्यान घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे दहावीची परीक्षा 01 मार्च ते 26 मार्च या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!