Soybean Variety: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की सोयाबीन पीक हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकरी घेत असतात पण अशाच सोयाबीनमध्ये एक प्रकारची सोयाबीन आलेली आहे तर ती कशा प्रकारची सोयाबीन आहे. या सोयाबीनला भाव किती असतो, व या सोयाबीनचे वैशिष्ट्य काय आहे ? याबद्दलची माहिती यामध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. ती तुम्ही अवश्य पहा.
सोयाबीन हे आपल्या भारत देशातील व महाराष्ट्र राज्यातील खरीप हंगामामधील एक प्रमुख पीक म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र व मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांसह देशभरातील अनेक भागांमध्ये या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जातात. पण सध्या सोयाबीनचे भाव घसरल्याने राज्यसह देशातील सुद्धा सोयाबीन उत्पादक शेतकरी हे चिंतेत पडले आहे. यावर देशातील उत्तराखंड या राज्यामध्ये काळ्या सोयाबीनचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते.
काळ्या सोयाबीनला सामान्य पिवळ्या सोयाबीनच्या तुलनेमध्ये अधिकप्रकारे भाव मिळतो. या काळ्या सोयाबीनची आयुर्वेदिक माहिती असल्याने डॉक्टरांकडून तिच्या आहारामध्ये समावेश करण्याचा सल्ला हा दिला जात आहे. आणि याच पार्श्वभूमीवर काळ्या सोयाबीन बाबतची माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊया. Soybean Variety
तर एका किलो ची किंमत ही किती आहे ?
तुम्हाला या पिवळ्या सोयाबीन ऐवजी काळ्या सोयाबीनचे उत्पन्न घ्यायचे असेल, तर तुम्ही केंद्र सरकारच्या शेतकरी कृषी व्यवसाय संघाच्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी उपलब्ध शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून हे बियाणे तुम्ही खरेदी करू शकतात. आणि सध्या बाजारामध्ये पिवळ्या सोयाबीनला जवळपास 4 हजार 400 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास हा भाव मिळत आहे. पिवळ्या सोयाबीनला एक किलो साठी 44 रुपये इतका दर मिळतो. या उलट एक किलो काळ्या सोयाबीनसाठी 120 रुपये एवढे मोजावे लागतात. यामध्ये विशेष म्हणजे सध्याच्या घडीला बाजारात काळे सोयाबीन हवे तितके उपलब्ध नाहीत, त्यामुळे त्याची मागणी ही अधिक असते.
जाणून घ्या काळ्या सोयाबीन ची वैशिष्ट्ये.
काळ्या सोयाबीनचा उपयोग हा आहारामध्ये प्रामुख्याने जपान, चीन, कोरिया व आशियाई या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. या सोयाबीनमध्ये पौष्टिक घटकांचे प्रमाण हे अधिक असते. सध्याच्या घडीला भारत देशामध्ये उत्तराखंड या राज्यात काळ्या सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. आणि त्या ठिकाणी त्या सोयाबीनचा आहारामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश देखील केला जातो.
हे सोयाबीन प्रामुख्याने सूप सलाड म्हणून आहारामध्ये वापरले जाते याशिवाय काळ्या सोयाबीनचे प्रोटीन आर्यन फायबर मॅग्नेशियम आणि विटामिन-ई याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. परिणामी या सोयाबीनचा उपयोग हा आपल्या आहारामध्ये करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून अनेकदा दिला जात असतो. ॲनिमिया या आजारासाठी ती विशेष गुणकारी म्हणून मांनली जाते.
तर शेतकऱ्यांनी या काळ्या सोयाबीनचे उत्पादन महाराष्ट्र राज्यामध्ये घेतले तर शेतकऱ्यांना अधिक प्रमाणावर उत्पन्न भेटेल व या काळ्या सोयाबीनची मागणी सुद्धा आणखीन जास्त वाढेल.
हे पण वाचा:- या राशींचे भाग्य आज सूर्यासारखे चमकेल, होणार आफिट धनलाभ..! पहा आजचे राशिभविष्य
महाराष्ट्रात काळी सोयाबीन पिकवता येते का?बियाणे मिळेल काय?