सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! नवीन सोयाबीन बाजार भाव जाहीर, कोणत्या बाजार समितीमध्ये मिळाला सर्वाधिक दर पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean market price : गेलं काही दिवसांपासून महाराष्ट्र मध्ये पावसाचे थैमान सुरू होतं, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. त्याचबरोबर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसलेला आहे. काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साचल्याने सोयाबीन पीक पूर्णपणे व्हायला गेले आहे. काही ठिकाणी सोयाबीन पुन्हा जागीच उगवली आहे. तर काही ठिकाणी काही उरल नाही सगळं वाहून गेल आहे. याच मुसळधार पावसाने कुठे शेतकऱ्यांच जनावरे वाहून नेले तर कुठे आता तोंडाशी आलेला घास वाहून नेला. पण याच सगळ्या दरम्यान महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभावात हलकी हालचाल सुरू झाली आहे. सध्या दर स्थिर दिसत आहेत, पण सणासुदीच्या काळामध्ये मागणी पुढील काही दिवसात वाढेल दरामध्ये थोडी उसळी येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. Soybean market price

आजचे भाव काय ? (Soybean market price October 2025)

लातूर पासून गंगाखेड पर्यंत बाजारातले भाव पाहिले तर कुठे भाव कमी तर कुठे वाढलेले दिसतात. पण एक गोष्ट स्पष्ट आहे गंगाखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल 5400 चा दर मिळालाय! म्हणजे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा संकटाच्या काळात धीर मिळाला आहे. खाली राज्यातील प्रमुख बाजार समितीमधील दर दिलेले आहेत (5 ऑक्टोबर 2025 पर्यंत)

लातूर किमान 31001, तर कमल 4499 आणि सरासरी 4350. अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान 3450, कमल 4517, तर सरासरी 4206, कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इमानदार चार हजार 100 तर कमाल दर 4420 आणि सरासरी 4290. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान दर तीन हजार पाचशे, तर कमलदर 4331,  सरासरी 3900. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान 3800, तर कमाल 4 430 आणि सरासरी चार हजार 100 प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान दर 3400 प्रतिक्विंटल तर कमाल दर 4490 आणि सरासरी 3800 प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे. गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान 5350 प्रतिक्विंटल तर कमाल 5400 प्रतिक्विंटल आणि सरासरी 5350 प्रतिक्विंटल असा दर सोयाबीन ला मिळाला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान 3850 रुपये तर कमाल 4400 रुपये आणि सरासरी 4150 रुपये असा दर मिळाला आहे.  राहुरी  वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान दर 3700 तर कमाल दर 4200 आणि सरासरी दर तीन हजार 950 रुपये प्रति क्विंटल असा मिळाला आहे. अमरावतीमध्ये किमान 4150 रुपये आणि कमाल 4400 तर सरासरी 4275 रुपये प्रति क्विंटल असा  दर मिळाला आहे.

तज्ञ सांगतात की गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारातील दरात थोडीशी घसरण झाल्यामुळे देशांतर्गत बाजारावरती परिणाम झालेला आहे. त्यातच राज्यात अतिवृष्टी सोयाबीनचे उत्पादन कमी यामुळे गुणवत्ता घसरली त्यामुळे व्यापारी सध्या सावध भुमिकेत आहेत. पण त्याच वेळी सणासुदीचा हंगाम सुरू असल्यामुळे मागणी वाढेल आणि तेल उद्योग तसेच फीड कारखान्यांकडून मागणी वाढेल असा अंदाज आहे. त्यामुळे पुढील आठवड्यामध्ये भावात थोडी वाढ दिसू शकते अशी शक्यता आहे.

(Disclaimer| वरील दिलेली माहिती अधिकृत स्त्रोतांच्या आधारे आहे, याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)

हे पण वाचा | सोयाबीन बाजार भावात मोठा बदल..! पहा आजचे राज्यातील सोयाबीन बाजार भाव

Leave a Comment

error: Content is protected !!