Soybean Bajar Bhav Today : सोयाबीनचे बाजार भाव मध्ये चढ-उतार , सोयाबीनचे आजचे बाजार भाव.
मागील आठवड्यापासून संपूर्ण राज्यामध्ये सोयाबीनची आवक वाढली असून, सोयाबीनचा बाजार भाव हा स्थिर प्रमाणात आहे. सोयाबीनचा बाजार भाव 4400 ते 4800 रुपये प्रति क्विंटल दिसून आला आहे. मात्र हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 5000 हजार रुपये दर हा कायम आहे. पण या व्यतिरिक्त महाराष्ट्रात अनेक बाजार समितीमध्ये सोयाबीन बाजार भाव मध्ये घसरन दिसून आली आहे.
शेती हवामान आणि बाजार भाव विशेष बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
प्रमुख बाजार समितीमध्ये सोयाबीन बाजार भाव :
- हिंगोली – कमल 5000 ते 4600 रुपये प्रति क्विंटल.
- वडूज बाजार समिती जिल्हा सातारा – 4900 ते 4700 प्रतिक्विंटल.
- अमरावती बाजार समिती – 4600ते 4500 प्रतिक्विंटल.
- अकोला बाजार समिती – 4600 ते 4200रुपये प्रतिक्विंटल.
- तुळजापूर बाजार समिती -4675 ते4500 रुपये प्रति क्विंटल.
- नागपूर बाजार समिती- 4500 ती 4200 रुपये प्रति क्विंटल.
- परभणी जिल्हा सेलू बाजार समिती – 4600ते 4200 रुपये प्रति क्विंटल.
- सोयाबीनचे असे भाव महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमध्ये दिसून आले आहे.
हे पण वाचा:- पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी जाहीर या लोकांना मिळणार 16 हप्ता, या यादीत तुमचे नाव तपासा
सोयाबीनची आवक वाढली :
आपल्याला माहित आहे बाजारामध्ये जेव्हा आवक जास्त होती तेव्हा दर हा कमी होतो. व जेव्हा बाजारामध्ये आवक कमी होते तेव्हा दर हा वाढला जातो. सोयाबीनच्या अवकेत वाढ झाली असून. त्याचा परिणाम सोयाबीन बाजारभाव मध्ये दिसून आला आहे.
महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे दर वाढतील या अपेक्षांनी सोयाबीनचा साठा ठेवला आहे. मात्र सध्या सोयाबीनची आवक वाढली असून सोयाबीनचे भाव घसरले आहे त्यामुळे शेतकऱ्याना निराशा होत आहे.
याच कामामुळे काही शेतकऱ्यांनी साठा केलेली सोयाबीन ही बाजार समितीमध्ये आणायला सुरुवात केली आहे. पण यावर्षी महाराष्ट्र मध्ये दुष्काळी संकटा बरोबरच अवकाळी पावस आला होता त्या ठिकाणी शेतकऱ्याचे नुकसान झाले आहेत, व आता शेतकऱ्याला सोयाबीनचा कमी दर मिळत असून शेतकरीचा खर्च सुद्धा मिळत नाही असे शेतकरी सांगत आहे.
हे पण वाचा:-नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या तारखेला होणार जमा, पहा सविस्तर माहिती