Soyabean Seed: नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी सोयाबीन बियाणाच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. खरीप हंगाम तोंडावर आहे, शेतकऱ्यांची बियाणे खरेदी करण्याची लगबग सुरू झाली आहे. अशा वेळेस सोयाबीन बियाण्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. काही खाजगी बियाणे कंपनीने मागणी असलेले सोयाबीन बियाण्याचे दर वाढवले आहेत. यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक बोजा वाढण्याची शक्यता आहे.
सोयाबीन बियाण्याचे भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सोयाबीन बियाणाच्या दरात किती वाढ झाली आहे?
चालू महिन्यातील कंपनीने 23 किलो वजनाच्या बॅगेची किंमत तब्बल 4150 रुपये इतकी निश्चित केली आहे. तर दुसऱ्या कंपनीने 25 किलो ची किंमत 3450 रुपये ठरवले आहे. गेल्या हंगामात प्रचंड मागणी असलेले सोयाबीन उत्पादक एका कंपनीच्या वाणाची किंमत यंदा किलोमागे 200 रुपये झाली आहे. Soyabean Seed
सोन्याच्या भावात 8700 रुपायची विक्रमी वाढ..! पहा आजचे सोन्याचे नवीन दर
पारंपारिक सोयाबीन वाणांवर काही परिणाम झाला का?
पारंपरिक 350 आणि 9305 या वाणांना मागणी कमी असल्याने त्यांच्या दरात काही बदल झाले नाही. मात्र इतर बियाण्याच्या दरात 300 ते 600 रुपये पर्यंत वाढ झाल्याचे दुकानदाराकडून सांगण्यात येत आहे. Soyabean Seed
बियाणे कंपन्या ची मार्केटिंग
काही सोयाबीन बियाणे कंपन्या गावोगाव येथे प्रतिनिधी पाठवून बुकिंग आणि पुरवठा करत आहेत. या विक्रीनंतर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पावती दिली जात नाही. राऊंड ऑफ बीटी नावाच्या तन नाशकाला प्रतिरोधक असलेल्या सोयाबीन बियाणाच्या जातीचा मोठा गोरख धंदा सुरू आहे. विशेष म्हणजे या मार्केटिंग वर गुणवंता नियंत्रण विभागाचे नियंत्रण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाणे खरेदी बाबत फसवणूक होत आहे.
ग्रामीण भागातील लोकांसाठी रेशन कार्डची नवीन यादी जाहीर, येथून यादीत तुमचे नाव तपासा
शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे
- शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावीत.
- सोयाबीनचे बियाणे खरेदी केल्यानंतर बिलाची किंवा पावतीची मागणी करावी.
- सरकारी बियाणे संस्थेकडून उपलब्ध असलेल्या बियाणाचा विचार करावा.
- कृषी बघा कडून बियाण्याच्या दराबद्दल माहिती घ्यावी.
- या वाढत्या बियाणाच्या दरामुळे शेतकऱ्यावर आर्थिक बोजा वाढण्याची शक्यता आहे.
- त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
1 thought on “शेतकऱ्याचा खर्च वाढणार..! खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीन बियाण्याच्या किमतीत मोठी वाढ, पहा सोयाबीन बियाण्याचे नवीन दर”