शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! सोयाबीनचे बाजार भाव 6 हजारावर, या कारणामुळे होणार सोयाबीनच्या दरात वाढ…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Rate In Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. तब्बल दोन महिन्यानंतर या शेतकऱ्यांसाठी दिलासा जनक बातमी समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्यात सोयाबीन हे पीक कॅश क्रॉप म्हणून ओळखले जाते.

जरी या पिकाला कॅश क्रॉप म्हणत असले तरी या पिकाची लागवड गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. या हंगामात देखील सोयाबीन अपेक्षित असा भाव मिळाला नाही. त्यामुळे सोयाबीन पिकाची शेती शेतकऱ्यांना परवडत नाही.

महाराष्ट्र राज्यातील अनेक महत्त्वाच्या कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये सोयाबीनचे भाव हमीभाव पेक्षा कमी झाले आहेत. परिणामी पिकासाठी आलेला खर्च देखील उत्पन्नातून निघत नाही. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन आणखीन बाजारात आणली नाही.

गेल्या वर्षी डिसेंबर 2023 मध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या काळात कमी पाऊस झाला होता. त्याचा परिणाम म्हणून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे सोयाबीनला अपेक्षित असा भाव मिळेल असे अशा शेतकऱ्यांमध्ये होती. पण सोयाबीनला हमीभाव मिळाला नाही तर शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

अशातच आता सोयाबीन बाजारभावात 50 ते 100 रुपयाची वाढ झाली असल्याने सविन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या दरम्यान आता सोयाबीनचे बाजार वाढणे मागचे कारण काय आहे हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

बाजार तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे सध्या सोयाबीनचे बाजार भाव 4600 रुपये पासून ते 5300 रुपयापर्यंत नमूद केले जात आहेत. अर्थातच गेल्या दोन दिवसाच्या बाजारभावाची तुलना केली तर यामध्ये 50 ते 100 रुपयाची वाढ झालेली दिसून येत आहे. Soyabean Rate In Maharashtra

बाजारभावात वाढ होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पाम तेलाच्या दरात झालेली वाढ हे आहे. इंडोनेशिया आणि मलेशिया या प्रमुख पाम उत्पादक राज्यात एल निनोमुळे पाम उत्पादन कमी झाले आहे. यामुळे पाम तेलाच्या दरात वाढ झाली आहे.

गेल्या दोन महिन्यापासून तेलाचा पुरवठा कमी होत असल्याने याच्या बाजारभावात वाढ झाली आहे याचा परिणाम म्हणून भारतात काम तेलाची आयात कमी झाले आहे त्यामुळे बाजारात सोयाबीन तेलाला आणि सूर्यफूल तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी आली आहे.

याच कारणामुळे प्रक्रिया उद्योगांमध्ये आणि बाजारात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे मागणी वाढली आहे त्यामुळे दरात काहीशी सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे बाजार समितीमध्ये सोयाबीनचे आवक कमी झाल्यामुळे देखील भावात सुधारणा झाली आहे.

अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विकला आहे आता बाजारात खूपच कमी सोयाबीनची आवक होत आहे यामुळे सोयाबीनचे सरासरी भाव 5 हजार रुपयांच्या वर येणार अशी आशा दिसून येत आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन बाजारात आणण्यापासून आणखीन थोडं थांबता येईल अशा शेतकऱ्यांनी आणखीन काही दिवस थांबून पाच हजाराच्या वर सोयाबीन बाजार भाव मिळवावा असे बाजारतज्ञ म्हणतात.

हे पण वाचा :-या यादीत ज्यांच्या नाव असेल त्यांनाच मिळणार मोफत रेशन आणि 8000 रुपयांची आर्थिक मदत तुमचे नाव येथे तपासा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! सोयाबीनचे बाजार भाव 6 हजारावर, या कारणामुळे होणार सोयाबीनच्या दरात वाढ…”

Leave a Comment

error: Content is protected !!