Soyabean Market Rate: नमस्कार सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांनो, सोयाबीनचे भाव वाढतील या आपेक्षाने बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन आणखीन घरातच साठवून ठेवली आहे. मागील हंगामात कमी पाऊस असल्यामुळे सोयाबीनचे उत्पन्न देखील खूपच कमी झाले होते. उत्पन्न कमी झाल्यामुळे सोयाबीनचे दर वाढतील या आपेक्षाही शेतकऱ्यांनी सोयाबीन घरातच साठवून ठेवली होती. मात्र हंगाम संपत आला असला तरी सोयाबीनच्या भावात अपेक्षित एवढी वाढ झाली नाही.
आजचा सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सोयाबीनचे बाजारभावात वाढ न झाल्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. नवीन हंगाम चालू होणार आहे शेतीच्या मशागतीसाठी बिया खतासाठी पैशांची गरज भासत आहे. अशा परिस्थितीत मागील वर्षाचा शेतीमाल विकला नाही तर पैशाची जुळवाजुळी कशी करायची हाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित आहे. त्यामुळे घरात साठवलेली सोयाबीन आता भाव वाढ होण्याच्या अगोदरच शेतकऱ्यांना बाजारात आणावे लागली आहे.
सोयाबीनचे भाव वाढतील या आशेने अजूनही 30 टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात साठवून ठेवलेली आहे. पण भाव काही वाढेना 4500 ते 5000 रुपये प्रति क्विंटल च्या पुढे सोयाबीनला भाव मिळत नाही. मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कुठवर शेतमाल घरातच साठवून ठेवायचा? खरीप हंगामातील खर्च डोळ्यासमोर ठेवून नाईलाजाने शेतकऱ्यांना आता सोयाबीन बाजारात विक्रीसाठी अनावच लागत आहे.
मान्सून अगोदर या भागात होणार जोरदार अवकाळी पाऊस! पहा पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणाच्या किमती
मान्सून तोंडावर आलेला आहे, शेतकऱ्याची बियाणे खरेदी करायची लगबग सुरू झाली आहे. आता खरीप हंगाम्यात पेरणी करिता शेतकऱ्यांना 30 किलो सोयाबीन बियाण्याला 3500 रुपये द्यावे लागणार आहेत. तुम्हीच सांगा शेतकऱ्यांची प्रगती अशा परिस्थितीत कशी होऊ शकेल? शेतकऱ्याकडून प्रशासनाला असे अनेक प्रश्न केले जात आहेत.
सोयाबीन पिकाचा उतारा बॅगला एकरी पाच ते सहा क्विंटल होतो. लागवड व इतर पूर्ण खर्च लावला तर शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादनातून खर्च काढला तर काहीच शिल्लक राहत नाही. एकतर्फ पिकाचा उतारा कमी आणि उत्पादित मालाला भावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याचे चित्र समोर येत आहे. Soyabean Market Rate
रेशन कार्ड धारकांसाठी गुड न्यूज! 1 जून पासून याच लोकांना मिळणार मोफत रेशन आणि सर्व शासकीय फायदे, यादीत तुमचे नाव पहा
सोयाबीन पीक पेरणी साठी एकूण खर्च 17 हजार रुपये येतो आणि उत्पन्न मिळते 20 हजार रुपये. अशा परिस्थितीत शेतीमालाला भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे समोर येत आहे. या हंगामात देखील यात काही बदल झाला नाही तर शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही.
शेतीमालाला भाव मिळाला तर कधी पावसाचा अभाव तर कधी अति प्रमाणात झालेल्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या हाती काहीच लागत नाही. अशा पेज प्रसंगात दुष्काळाचे गडद सावट शेतकऱ्यांसमोर उभा आहे. पिकवली तर शेती, नाहीतर कष्टांची माती, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. शासनाने शेतमालाला चांगला भाव दिल्याशिवाय शेतकऱ्यांची प्रगती होणे शक्य नाही. निसर्ग तर त्याचा खेळ खेळत राहणार, पण प्रशासनाच्या हातात असलेले शेतीमालाला भाव देणे. याकडे शासनाने लक्ष द्यावे.
2 thoughts on “भाववाढीच्या अपेक्षेने सोयाबीन अजून घरातच! सोयाबीनचा भाव वाढणार का नाही? पहा सोयाबीन बाजार भाव”