पिवळे सोने उजळले..! सोयाबीनची आवक आणि दर वाढले, पहा आजचा सोयाबीन बाजार भाव (Soyabean Market Rate)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Market Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात पिवळे सोने म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन पिकाची आवक आणि दर वाढले आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. आपण नेहमी बाजारात पाहत असतो की जर मालाची आवक कमी झाली तर मालाचे भाव वाढतात. किंवा मालाची आवक वाढली तर मालाचे भाव कमी होतात. मात्र यावेळेस सोयाबीनच्या बाबतीत तसे घडले नाही. सोयाबीन पिकाची आवक देखील वाढली आहे आणि दरात देखील वाढ झाली आहे.

वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये काही दिवसापासून सोयाबीनचे भाव स्थिर आहेत. आता शेतकरी खरीप हंगामाची तयारी करत आहेत. यासाठी पैसे हाती असणे आवश्यक असल्याने शेतकरी दरवाढीच्या अपेक्षेने साठवलेली सोयाबीन विकू लागले आहेत. त्यामुळे बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. Soyabean Market Rate

मागील काही दिवसापासून सोयाबीनच्या दरात थोड्याफार प्रमाणात तेजी आले आहे. नाफेडणे हमीभाव खरेदीला मुदतवाढ दिल्यानंतर सोयाबीनचे दर पावणेसहा हजार पर्यंत पोहोचले होते. त्यामुळे सोयाबीनचे दर पाच हजाराच्या टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र नाफेडच्या खरेदीची मुदत संपत आली असतानाच बाजार समितीत पुन्हा सोयाबीनच्या दरात घसरण होऊ शकते.

सध्याच्या स्थितीला जिल्ह्यातील बाजार समितीत सोयाबीनला सरासरी 4500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. पुढे सोयाबीनच्या दरात वाढ होईल का नाही याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही. खरिप हंगामाच्य तयारीसाठी शेतकऱ्यांना पैसा हवा आहे. त्यामुळे सर्व शेतकरी सोयाबीन विकत आहेत.

पहा कुठे होते सर्वात जास्त आवक

  • वासिम- 6500 क्विंटल
  • कारंजा – 4500 क्विंटल
  • मं. पिर – 1400 क्विंटल
  • मानोरा – 500 क्विंटल

पहा कुठे मिळतोय सर्वात जास्त दर

  • कारंजा – 4580 रुपये प्रति क्विंटल
  • मं. पिर – 4580 रुपये प्रति क्विंटल
  • मनोरा – 4565 रुपये प्रति क्विंटल
  • वाशिम – 4525 रुपये प्रति क्विंटल

सोयाबीनच्या दरात वाढ होणार का?

भारतात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सोयाबीन उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्याच्या स्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी आणि खाद्यतेलाची टंचाईच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन निर्यातीच्या संधी वाढतील. त्यामुळे येणाऱ्या काळात सोयाबीनचे दर वाढणार आहेत. त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता बाजार तज्ञ यांनी वर्तवले आहे.

शेतकऱ्यांकडे किती सोयाबीन शिल्लक आहे?

यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्याचबरोबर सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी मात्र काही शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे सोयाबीन विकावी लागत आहे. त्यामुळेच बाजार समितीत सोयाबीनचे आवक चांगलीच वाढली आहे. आतापर्यंत भाववाढीच्या अपेक्षा मुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन विकली नव्हती. मात्र आता शेतकरी सोयाबीन विकण्यासाठी लाचार झाला आहे.

आवक आणखीन वाढणार का?

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला वेग दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीच आठवलेला शेतमाल म्हणजे सोयाबीन विकत आहेत. बाजार समित्याच सोयाबीनच नाहीतर शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या इतर शेतमालाची देखील चांगली आवक होत आहे. पुढील दोन आठवडे बाजार समितीत सोयाबीनचा इतिहास शेतमालाची आवक वाढणारच आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!