Thursday

13-03-2025 Vol 19

सोयाबीनच्या दरात होणार मोठी वाढ..! आंतरराष्ट्रीय पातळीवर गोडतेलाला मागणी वाढली

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Market Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सोयाबीनचे दर वाढण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीनच्या गोड तेलाला तेजी आली आहे. त्यामुळे सोयाबीन च्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे दर किती वाढू शकतात व कशामुळे वाढू शकतात याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

गेल्या दोन खरीप हंगामापासून सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. केंद्र शासनाच्या किमान हमीभावापेक्षा ही दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करावी लागत आहे. मात्र सोयाबीनच्या तेलाच्या दरात मोठी वाढ होऊ लागल्याने सोयाबीनचे दरही वाढणार आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर गोड तेलाला तेजी असल्याने देशांतर्गत बाजारपेठेत ग्राहकांना मोठा चटका बसत आहे. गेल्या आठ-दहा दिवसात गोड तेलाच्या दरात वाढ झालेली असून, सरकी व सोयाबीन तेलाचे दर प्रति किलोमागे 5 ते 12 रुपयांनी वाढले आहेत.

सध्याच्या काळात तरी तेल बियाण्याची आवक कमी दिसत असून, एप्रिल महिन्यात गोड तेलाच्या दरात आणखीन तेजी पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. असा बाजारपेठेचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या आपल्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर मोठा परिणाम होत असतो. सध्या या बाजारपेठेत गोड तेलाचे दर वाढतच आहेत.

Soyabean Market Rate

त्यात देशांतर्गत तेल बियाचे उत्पादन काहीसे प्रमाणात निसर्गाच्या आपत्तीमुळे कमी झाल्याने त्याचा परिणाम देखील दिसत आहे. आपल्याकडे सरकी,.सोयाबीन, शेंगदाणा त्यालाच उत्पादन घेतले जाते. सध्या सरकी व सूर्यफूल त्याला आणि चांगली उसळी घेतली आहे. शेंगदाणा तेलाचे दर स्थिर असले तरी सर्वाधिक व्यापार असणाऱ्या सरकी तेलाच्या दरात प्रति किलो बारा रुपयाची वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत दोन्ही बाजारपेठेचा अंदाज घेतला तर एप्रिल महिन्यामध्ये ही गोड तेलाला तेजी राहण्याचा अंदाज आहे. आपल्याकडे साधारण एप्रिल मे महिन्यात पावसाळ्याची बेगमी म्हणून गोड तेलाची खरेदी करून ठेवले जाते. त्यामुळे या काळात मागणी वाढते. मात्र यंदा याच काळात तेलाला तेजी राहणार असल्याने व्यापाऱ्यांनी तेलाची खरेदी करताना सावधानता बाळगली आहे.

सोयाबीनचे दर वाढण्यास होणार मदत..!

गेल्या दोन खरीप हंगामापासून सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. केंद्र शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करावे लागले आहे. मात्र गोड तेलाच्या दरात वाढ होऊ लागल्याने सोयाबीनचे दर देखील वाढणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या देशात सोयाबीनचे उत्पादन कमी

ब्राझील व अर्जेंटेनिया मध्ये सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. मात्र यंदा येथे उत्पादन घटल्याचा परिणाम अंतराष्ट्रीय पातळीवर गोड त्यालाच्या दरावर झाल्याचे तज्ञाचे मत आहे.

हे पण वाचा:- पांढरे सोने चमकले..! कापसाचे भाव सुधारले, पण….

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Krushna

One thought on “सोयाबीनच्या दरात होणार मोठी वाढ..! आंतरराष्ट्रीय पातळीवर गोडतेलाला मागणी वाढली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *