Soyabean Market Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणारी बातमी समोर येत आहे. मागील दोन दिवसात अनेक बाजार समितींना सुट्ट्या होत्या. मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार मागील दोन दिवसात फक्त तीनच बाजार समितीमध्ये सोयाबीनचा लिलाव पार पडला आहे. परवा दिवशी रविवार असल्यामुळे बाजार समितीला सुट्टी होती तर काल म्हणजे सोमवारी शिवजयंती असल्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच बाजार समित्या बंद होत्या.
यादरम्यान मोर्शी, राहता, वरोरा शेगाव या तीनच बाजार समितीमध्ये सोयाबीनचे आवक झाले आहे. मोर्शी बाजार समितीमध्ये 200 क्विंटल, राहता बाजार समितीमध्ये 5 क्विंटल व वरोरा शेगाव बाजार समितीमध्ये 15 क्विंटल सोयाबीनच्या झाली आहे. या तिन्ही बाजार समितीमध्ये अनुक्रमे 4215 रुपये प्रति क्विंटल, 4315 रुपये प्रतिक्विंटल, 4320 रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.
तर मागील दोन दिवसात सर्वात कमी सरासरी दर मोर्शी बाजार समितीमध्ये 4200 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. आजच्या दिवसातील सर्वात जास्त दर राहता बाजार समितीमध्ये 4350 रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळाला आहे. यानंतर मंगळवारी सर्व बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या व चांगल्या प्रमाणात चालू होईल. व सोयाबीनला योग्य तो हमीभाव मिळेल अशा अशा सर्व शेतकऱ्यांना आहे.
पहा सविस्तर मागील दोन दिवसातील सोयाबीन बाजार भाव
बाजार समिती | शेतीमाल | परिणाम | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
मोर्शी | सोयाबीन | प्रतिक्विंटल | 200 | 4100 | 4330 | 4215 |
राहता | सोयाबीन | प्रतिक्विंटल | 5 | 4300 | 4350 | 4350 |
वरोरा-शेगाव | सोयाबीन | प्रतिक्विंटल | 16 | 4350 | 4300 | 4300 |
पुढे वाचा…..
हे पण वाचा:- शेवटी तारीख जाहीर..! 16व्या हप्त्याचे 4000 रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ लागले, पाहा सविस्तर माहिती
3 thoughts on “या बाजार समितीत मिळत आहे सोयाबीनला हमीभाव पेक्षा जास्त बाजार भाव, पहा आजचा बाजार भाव (Soyabean Market Rate)”