Shettale Subsidy | शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. मुख्यमंत्री श्वासोत कृषी सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे अर्थात मागेल त्याला शेततळे योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता सबसिडी वरती शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
या साठी राज्य शासनाच्या मार्फत 80 कोटी रुपयांचा निधी कृषी विभागाला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी शेततळे अनुदानासाठी अधिक अर्ज करावा तसे आव्हान राज्य कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहेत.
राज्य शासनाच्या मार्फत आत्तापर्यंत 7316 शेततळ्यांकरिता शेतकऱ्यांना 50.81 कोटी रुपये निधी अनुदान देण्यात आलेले आहे. तसेच 1 हजार 665 शेतकऱ्यांच्या अनुदान देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
तसेच या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे करिता शासनाच्या अंतर्गत आणखी वीस कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे खोदकामासाठी 75 हजार रुपये पर्यंत निधी दिला जाणार आहे.
तसेच, शासनाच्या माध्यमातून शेततळ्यास प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी 75 रुपये वेगळी अनुदान देण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणी महाडीबीटी पोर्टल द्वारे करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे संपर्क साधावा असे आव्हान शासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहेत.
इथे करा अर्ज
- राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन द्वारे राबविणत येणार आहे.
- तसेच तुम्ही आपल्या तालुक्याच्या कृषी विभागात कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या योजनेबाबत माहिती विचारू शकता.
- तसेच यासाठी अधिकाऱ्याकडून मागील त्याला शेततळे या योजनेतून घ्यायचा आहे या फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायचे आहे.
- व त्यानंतर तुमच्या अर्जासोबत आवश्यकते कागदपत्रे जोडायचे आहे तुमचा अर्ज कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करायचा आहे
मागेल त्याला शेततळे योजनेसाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- आधार सोबत लिंक असलेले बँक पासबुक झेरॉक्स
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र
- जमिनीची कागदपत्रे 7/12, 8 अ
- जात प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे पासपोर्ट फोटो