Friday

14-03-2025 Vol 19

Shabari awas Yojana 2023 : शबरी आवास योजना अंतर्गत घरे बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shabari awas Yojana 2023 | शबरी घरकुल योजना अंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमाती च्या लाभार्थ्यांसाठी घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये इतका रक्कम देण्यात येत आहे तसेच या योजनेचे पात्रता व ग्रामीण भागामधील अनुसूचित जमाती किती रक्कम मिळेल. अर्ज करण्याची पद्धत या सर्व गोष्टींचे आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

शबरी घरकुल योजना (Shabari awas Yojana 2023)

महाराष्ट्र मधील ग्रामीण तसेच शहरी भागातील बहुतांश अनुसूचित जमाती कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली राहतात व त्यांच्या जवळ राहण्यासाठी स्वतःचे घरीही नाही गरीब आर्थिक दृष्ट्या परिस्थितीमुळे त्यांना स्वतःचे पक्के घर बांधता येत नाही अशा कुटुंबांना मातीच्या घरात राहावे लागते त्यामुळे त्यांना ऊन पाऊस थंडीचा सामना करावा लागत असतो. अशाच समस्येचा विचार करून महाराष्ट्र सरकारने त्यांना घरी बांधण्यासाठी शबरी घरकुल योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे व या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू झालेली आहे.

हे पण वाचा : शेतीला तार कंपाउंड बांधण्यासाठी महाराष्ट्र शासन देणार 90 टक्के अनुदान अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

शबरी घरकुल योजना पात्रता ( Sabari Gharkul Scheme Eligibility )

  • लाभार्थी हा महाराष्ट्र राज्य मधील अनुसूचित जमाती संवर्गातील असावा लागतो
  • लाभार्थ्या महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • लाभार्थगडी स्वतःची किंवा राज्य शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याकडे स्वतःचे किंवा कुटुंबाचे पक्के घर नसणे गरजेचे आहे.
  • निराधार , विधवा , परित्यक्ता , दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल

शबरी घरकुल योजना अंतर्गत या भागातील लाभार्थ्याला मिळतील इतकी रक्कम

  • ग्रामीण भागातील लाभार्थ्याला , ₹ 1.00 लाख रुपये
  • नगरपरिषद क्षेत्रामधील लाभार्थ्याला ₹ 1.50 लाख रुपये
  • महानगरपालिका क्षेत्रामधील लाभार्थ्याला ₹ 2.00 लाख रुपये

शबरी घरकुल योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्रे (Necessary Documents Required Under Sabari Gharkul Yojana)

  • रेशन कार्ड ( ration card)
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • मोबाईल क्रमांक
  • आधार कार्ड
  • ई-मेल आयडी
  • रंगीत आकाराचे पासपोर्ट साईज फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • वयाचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
  • जागेचा सातबारा उतारा तसेच 8 अ दाखला
  • ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र
  • बँक खात्याचा तपशील

शबरी घरकुल योजना अर्ज करण्याची प्रक्रिया (Shabri Gharkul Yojana Application Process)

  • ग्रामीण भाग – ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी प्रथम त्यांच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जिल्हा कार्यालयात जाऊन शबरी घरकुल योजनेचा अर्ज घ्यावे व अर्जात विचारलेल्या संपूर्ण माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडून अर्ज सादर करावा.
  • शहरी भाग – शहरी भागातील लाभार्थ्यांनी प्रथम त्यांच्या भागातील महानगरपालिका किंवा नगरपालिका कार्यालयात जाऊन शबरी घरकुल योजनेचा अर्ज घ्यावे व अर्ज विचारलेले संपूर्ण माहिती भरून वर दिलेले सर्व कागदपत्रे जोडून अर्ज सादर करावे या योजनेअंतर्गत तुमचे अर्ज प्रक्रिया पूर्ण करेल

आशा सरळ सोपे भाषांमध्ये व तुमच्या मोबाईल वरती योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला योजनेविषयी माहिती लवकरात लवकर मिळेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Rushikesh

2 thoughts on “Shabari awas Yojana 2023 : शबरी आवास योजना अंतर्गत घरे बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *