SBI Share Market Value: नमस्कार मित्रांनो, देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया साठी मागचा आठवडा खूप चांगला गेला आहे. बँकेच्या शेअर धारकांनी अवघ्या चार दिवसात सुमारे 27 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र दुसरीकडे मुकेश अंबानीच्या रिलायन्स पासून ते एअरटेल पर्यंत अनेक कंपन्याचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.
SBI मध्ये गुंतवणूक करण्यासाठी येथे क्लिक करा
बँकिंग शेअर मध्ये मोठी वाढ
गेल्या आठवड्याच्या चार कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूक दारावर पैशांचा पाऊस पडला होता. त्यामध्ये एसबीआय सर्वात आघाडीवर आहे. एसबीआय शेअर मध्ये वाढ झाल्याने बाजार भांडवल 742126.11 कोटी रुपयावर पोहोचले आहे. फक्त चार दिवसात यात 26 हजार 907.71 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेच्या गुंतवणूकदारांनाही चार दिवसात 24 हजार 651.55 कोटी रुपयाची कमाई झाली आहे. तर ICICI बँकेचे मार्केट कॅप 802401.77 कोटी रुपयावर पोहोचले आहे.
तूर, कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरची या शेती पिकांना पहा कुठे काय मिळतोय बाजार भाव?
एसबीआयची सर्वात जास्त कमाई
टाटा ग्रुपची आयटी कंपनी टीसीएसची चार कमाई करणाऱ्या कंपन्यांमध्ये समावेश आहे. गेल्या आठवड्यात कंपनीने बाजार भांडवल 9587.95 कोटी रुपयांनी वाढले आणि 1389110.43 कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहे. याशिवाय HDFC बँकेच्या बाजार भावात 6761.25 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मार्केट कॅप 1153704.85 कोटी रुपये झाले आहे.
या गुंतवणूकदारांना बसला फटका
गेल्या आठवड्यात ज्या शेअरमुळे गुंतवणूकदाराचे पैसे बुडाले, त्यात भारती एअरटेल आघाडीवर होती. एअरटेल चे मार्केट कॅप 27935.65 कोटी रुपयांनी घसरून 723110.70 कोटी रुपयावर येऊन पोहोचले आहे. तर रिलायन्स मार्केट कॅप 23341.56 कोटी रुपयांनी घसरून 1940738.40 कोटी रुपये घेऊन पोहोचले आहे. SBI Share Market Value
नागरिकांसाठी मोठा दिलासा..! LPG गॅस सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन दर
यासोबतच एलआयसी 5724.13 कोटी रुपयांनी घसरून 619217.27 कोटी रुपये वर आली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील दुसऱ्या सर्वात मोठी कंपनी असलेली इन्फोसिस ची मार्केट कॅप देखील 5686.70 कोटी रुपयांनी घसरून 587949.62 कोटी रुपये वर आले आहे.
टीप: शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
2 thoughts on “SBI चे गुंतवणूकदार मालामाल..! फक्त चार दिवसात केली 27 हजार कोटी ची कमाई…”