( KISAN CREDIT CARD )
KCC : – नमस्कार शेतकरी मित्रांनो एसबीआय बँकेद्वारे खाते उघडणार यांना सरकार तीन लाख रुपये दिले काय आहे योजना?. आपण या योजनेची माहिती पाहणार आहोत शेती करताना शेतकऱ्यांना मोठ्या मोठ्या संकटांना सामना करावा लागत असतो.त्यामुळे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. त्या योजनेचा लाभ देशातील आज करोडो शेतकऱ्यांना भेटत आहे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
सरकारची अशीच एक योजना आहे त्याची माहिती शेतकऱ्यांना आजपर्यंत नाही. जर तुम्ही SBI बँक मध्ये खाते उघडले तर तुम्हाला सरकारकडून एकूण तीन लाख रुपयांचा फायदा होईल. या योजनेचे नाव किसान क्रेडिट कार्ड (KISAN CREDIT CARD ) कसे आहे व काय आहे योजना जाणून घ्या.
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मैत्रीनुसार किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा एकमेव उद्देश आहे. की शेतकऱ्यांना त्यांच्या शेती आणि इतर गरजांसाठी एसबीआय बँकिंग प्रणाली द्वारे कमी व्याजदर वर कर्ज उपलब्ध करून देणे जर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आजच जवळच्या आपल्या एसबीआय बँकेच्या शाखेत जाऊन किसान क्रेडिट कार्ड खाते उघडावे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा या योजनेअंतर्गत खाते उघडणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
किती टक्के व्याज दराने मिळेल कर्ज
शेतकऱ्यांना जर शेतीचे काम पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावा यासाठी कमी व्याज दराने व सोप्या पद्धतीने कर्ज उचलून उपलब्ध करून देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड ही योजना राबवली जात आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कमीत कमी टक्केवारीने कर्ज मिळावे म्हणून ही योजना सुरू करण्यात येत आहे 7 टक्के व्याजदर आणि तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज घेता येते. मध्ये आनंदाची बाब म्हणजे जर शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड केली तर शेतकऱ्यांना तीन टक्के व्याजदराने कर्जाची परतफेड करावी लागेल.
या योजनेसाठी कोण पात्र असेल
देशातील प्रत्येक शेतकऱ्यांना या योजनेचा योजनेचा लाभ देण्यात येत आहे . या योजनेअंतर्गत खते बियाणे, कृषी यंत्र, मत्स्यपालन, पशुपालन,अशा अनेक प्रकारच्या शेती निगडित कामांसाठी सरकार द्वारे कर्ज देण्यात येईल, या योजनेचा अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे वय 18 ते 75 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी किसान क्रेडिट कार्ड काढणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ घेता येईल.
या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेसाठी अर्ज कसा करावा
तुम्हाला जर किसान क्रेडिट कार्ड (KCC) या योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला पीएम किसान पोर्टलवरून सर्वात अगोदर केसरी फॉर्म डाउनलोड करावा लागणार आहे व आधार कार्ड पॅन कार्ड आणि त्यांचे एक छायाचित्र ( झेरॉक्स ) तसेच अर्जदाराने शेतीचे कागदपत्रे ( 7/12) व सर्व माहिती फॉर्म मध्ये टाकावी नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेजवळ शाखेत जाऊन सर्व कागदपत्रे जमा करावेत व खाते उघडावे. नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येईल.