Thursday

13-03-2025 Vol 19

तिखट बनवताय तर तुमच्यासाठी गुड न्यूज..! लाल मिरचीचे दर झाले स्वस्त…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Red Chilli Price: नमस्कार मित्रांनो, उन्हाळा चांगलाच कडाडल्या पासून मसाला तयार करण्यासाठी महिला वर्गांची धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारात लाल मिरचीची मागणी वाढली असली तरी तुलनेत आवक कमीच आहे. आवक कमी असल्यामुळे लाल मिरचीचे दर गगनाला भिडले होते. मात्र आता कर्नाटकचे लाल मिरची कमी दरात विक्रीसाठी आली आहे.

प्रत्येक शहरातील अनेक चौकात प्रामुख्याने रस्त्यावर शेतकरी आपल्या शेतातील माल विक्रीसाठी घेऊन दाखल झाले आहेत. त्यामुळे महिलांना बाजारात न जाता दारातच आणि बाजारभावापेक्षा कमी दरात मिरची घेता येत असल्याने महिला वर्गात समाधान दिसून येत आहे. मात्र अशा प्रकारे मिरची विकल्यामुळे व्यापाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

2 दिवसात 3 टन लाल मिरचीची विक्री

पनवेल परिसरात नवीन पनवेल या ठिकाणी लाल मिरची दाखल होतात महिला वर्गांची खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. यामध्ये प्रामुख्याने लवंगी आणि संकेश्वरी जातीची मिरची बाजारात आली आहे. सध्याच्या स्थितीत या मिरचीचा बाजार भाव 250 ते 280 रुपये प्रति किलो आहे. तर काही शेतकऱ्याने 200 रुपये प्रति किलो विक्री देखील केली आहे. शेतातील माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचत असल्यामुळे चांगलाच नफा मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

लाल मिरचीची मागणी वाढली | Red Chilli Price

  • उन्हाळा सुरू होताच लाल मिरचीची मागणी वाढली आहे. उन्हाळ्यात अनेक घरातून मसाला बनवला जातो. काहीजण घरगुती मसाल्यासाठी तर काहीजण छोट्या-मोठ्या मसालाच्या व्यवसायासाठी मिरचीची खरेदी करत आहेत. त्यामुळे लाल मिरचीला मोठी मागणी मिळत आहे.
  • कर्नाटक विजापूर मधील जमखंडी येथील एका शेतकऱ्याने चार एकर शेतीमध्ये लवंगी मिरचीचे उत्पादन घेतले. शेतीतील निघणाऱ्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने उत्पादनात मोठा तोटा सहन करावा लागतो.
  • मिरचीची विक्री करताना बाजारात व्यापाऱ्यांना न विकता थेट ग्राहकापर्यंत पोहोचवावे म्हणजे त्यामध्ये शेतकऱ्याचा ही फायदा होतो आणि ग्राहकांचाही फायदा होतो.
  • याच उद्देशाने काही शेतकऱ्यांनी काढणी झाल्यानंतर विक्रीसाठी पनवेल गाठले. बाजारभावापेक्षा कमी दरात मिरची मिळत असल्यामुळे लाल मिरची खरेदीसाठी गर्दी देखील वाढली आहे.

लवंगी तसेच संकेश्वरी या जातीची लाल मिरची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मागितली जाते. याचा विचार करून शेतकऱ्याने लाल मिरचीची लागवड केली आहे. उत्पन्न निघल्यानंतर शेतमाल बाजारात न घेऊन जातात थेट ग्राहकांना विक्री केल्यामुळे चांगलाच नफा मिळाला आहे.

हे पण वाचा:- शिधापत्रिका धारकांसाठी आनंदाची बातमी..! मोफत रेशनसोबतच तुम्हाला या 9 गोष्टी मिळतील फक्त 100 रुपयांमध्ये, पहा संपूर्ण माहिती

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Krushna

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *