Red Chilli Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंद बाजार समितीत लाल मिरचीचे दर प्रति क्विंटल चार ते दहा हजाराने कमी झाले आहेत. बाजारपेठेत सर्वच वस्तूचे दर वाढल्याने परेशान झालेल्या ग्रहणीला लाल मिरचीचे दर घसरल्यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र लाल मिरचीचे आवक जास्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
उन्हाळा लाल मिरची खरेदी करण्याचा हंगामा असतो या काळात नवीन मिरची बाजारात येते ही लाल मिरची खरेदी करून तिचे वर्षभर पुरेल इतके तिखट करून ठेवले जाते. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव कमी झाल्याने मिरची जास्त प्रमाणात खरेदी केली जात आहे.
महाराष्ट्र राज्यातील धुळे नंदुरबार सह कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील बाजार समितीतून सर्वात जास्त मिरचीची आवक होते. गेल्या वर्षी सी फाइव्ह या संस्कृत मिरचीचा दर 17 हजार रुपये प्रति क्विंटल 20 हजार रुपये प्रति क्विंटल होता. मात्र तो यंदा 11 हजार रुपये ते 15 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा आहे.
गेल्या वर्षी सर्वात जास्त दर पाहिला तर 20 हजार रुपये प्रति क्विंटल ते 22 हजार रुपये प्रति क्विंटल होता. तो यंदा 16 हजार रुपये ते 19 हजार रुपये प्रति क्विंटल वर आहे. ब्याडगी मिरचीचा दर 1000 ते 1500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत घसरला आहे. गेल्या वर्षी प्रतिक्विंटल 30 हजारापुढे असलेल्या ब्याडगी यंदा मात्र 15 हजार ते 20 हजार रुपये प्रति क्विंटल झाली आहे.
मिरची पावडरच्या घरात देखील घट | Red Chilli Price
यावर्षी मिरची पावडरच्या दरात देखील 50 ते 300 रुपयांची घट पायाला मिळाले आहे. मिरची घेऊन तिखट बनवण्यापेक्षा अनेक महिला पावडर खरेदी करण्यास पसंती देतात. मात्र त्याचे प्रमाण हे कमी आहे. सध्या बाजारात पावडर प्रति किलो 150 ते 300 रुपये दराने विकली जात आहे. सी फाइव्ह पावडरचा प्रति किलो 150 ते 200 व ब्याडगी 300 रुपये भाव आहे. गेल्या वर्षी ब्याडगीचा दर 500 रुपये होता तर साध्या पावडरचा दर प्रति किलो 200 ते 240 रुपये एवढा आहे.
दररोज किती आवक येते?
महाराष्ट्रातील सोलापूर बाजार समितीत लाल मिरचीची आवक वाढल्याने दर घसारले आहेत. राज्यातील धुळे नंदुरबार सह कर्नाटक आंध्र प्रदेशात उत्पादन वाढल्याने दररोज चार ते पाच हजार पोती लाल मिरचीची आवक होत आहे. यात सर्वाधिक सी फाइव्ह मिरचीला मागणी आहे. बाजार समितीमध्ये सी फाइव्ह ची सर्वाधिक आवक आहे. त्याचबरोबर ब्याडगीची आवक कमी आहे.
हे पण वाचा:- सोन्याचे भाव अचानक कोसळले, पहा आपल्या शहरातील 10 ग्रॅम सोन्याचे भाव
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा