RBI New Rule: नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे. कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर हा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळेच रिझर्व बँक ऑफ इंडिया ने याबाबत नवीन नियम अपडेट केले आहेत. या नवीन नियमानुसार आता ग्राहकांचा सिबिल स्कोर प्रत्येक पंधरा दिवसानंतर अपडेट केला जाणार आहे.
कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर हा खूप महत्त्वाचा आहे. अरबी आणि याबाबत नवीन नियम बनवले आहे. या नवीन नियमानुसार आता दर पंधरा दिवसांनी ग्राहकांचा सिबिल स्कोर अपडेट केला जाणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना त्यांचा सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी थोडेसे अतिरिक्त लक्ष द्यावे लागणार आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर त्यांना स्वतःला नेहमी चांगल्या आर्थिक स्थितीत ठेवावे लागणार आहे.
आरबीआयचा हा नवीन नियम एक जानेवारी 2025 पासून लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जर तुम्हाला हा नियम माहित नसेल आणि त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर खराब झाला तर तुम्हाला पुढच्या वेळी कर्ज मिळण्यासाठी बँकेमध्ये फेऱ्या माराव्या लागतील त्यामुळे हा नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
नवीन नियमाचा तोटा कोणाला?
आरबीआयच्या नवीन नियमाचा फटका जे ग्राहक कर्जाची वेळेवर परतफेड करत नाहीत, एम आय भरण्यास विसरतात त्यांच्यावर होणार आहे. यामुळे त्यांचा क्रेडिट स्कोर घसरू शकतो. क्रेडिट स्कोर घसरल्यानंतर त्या ग्राहकांना पुढच्या वेळी कर्ज घेण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. RBI New Rule
सिबिल स्कोर 15 दिवसांनी अपडेट केला जाईल
आरबीआयच्या नवीन नियमानुसार ग्राहकांचा क्रेडिट स्कोर दर पंधरा दिवसांनी अपडेट केला जाईल. सर्व बँका आणि वित्तीय संस्थेने आता लवकरात लवकर क्रेडिट स्कोर अपडेट करावा असे आरबीआयने स्पष्ट सांगितले आहे. आरबीआय गव्हर्नर यांनी नुकतीच याची घोषणा देखील केली आहे.
कोणत्या तारखेला अपडेट केला जाईल?
आरबीआयच्या नियमानुसार ग्राहकाचा cibil स्कोर महिन्याच्या पंधरा तारखेला आणि शेवट अपडेट केला जाऊ शकतो. क्रेडिट संस्था आणि क्रेडिट इन्फोर्मेशन कंपन्या यांच्या इच्छा असल्यास ते त्यांच्या इच्छेनुसार काही तारखा देखील निश्चित करू शकतात. त्यानुसार डेटा दर 15 दिवसाला अपडेट केला जाऊ शकतो.
फायदा कोणाला होणार ?
या निर्णयाचा फायदा कर्ज घेणारे आणि देणारे दोघांनाही होणार आहे. बँका आणि NBFC दोघांसाठी योग्य क्रेडिट माहिती खूप महत्त्वाची आहे. याद्वारे ते कोणाला कर्ज द्यायचे आणि कोणाला नाही द्यायचे याबद्दल अधिक चांगल्या निर्णय घेऊ शकतात. या निर्णयामुळे कर्जावर आकारण्यात येणारा व्याजदर ठरवण्यात देखील मदत होणार आहे. चांगला क्रेडिट स्कोर असलेल्या ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते.
बँकांना अचूक डेटा मिळेल
क्रेडिट स्कोर दर पंधरा दिवसांनी अपडेट केल्यामुळे बँकाकडे ग्राहकाचा आचुक डेटा असेल. जेणेकरून त्यांना कळेल की कोणत्या ग्राहक कर्ज फेडण्यात चांगला किंवा वाईट आहे. अशा परिस्थितीत बँक योग्य ग्राहकाला योग्य दराने कर्ज देऊ शकेल. यामुळे डिफॉल्ट ची संख्या खूप कमी होईल.
One thought on “अरबीआयने सिबिल स्कोरच्या नियमात केले मोठे बदल! नवीन नियम लगेच जाणून घ्या नाहीतर होऊ शकते नुकसान”