Ration Update : सर्वात मोठी बातमी ! मोदी सरकारकडून देशातील 80 कोटी लोकांना दिवाळी गिफ्ट, पाच वर्षे मिळणार मोफत राशन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Update : दिवाळी सणा निमित्त मोदी सरकार देशातील गोरगरीब लोकांना दिवाळीनिमित्त मोठा गिफ्ट देणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत रेशन योजनेचा कालावधी पुढील पाच वर्षासाठी वाढवण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळे देशातील 80 कोटी लोकांना पुढील पाच वर्षे मोफत रेशन मिळणार आहे.

देशातील कोट्यावरी गरीब लोकांना मिळणार मोफत राशन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील करोडो गरीब जनतेला दिवाळी गिफ्ट दिली आहे. केंद्र सरकारच्या मोफत रेशन मिळण्याची प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत पाच वर्षाची वाढ केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील कोट्यावधी गरीब लोकांना सरकारकडून रेशन मोफत दिले जाते. दिवाळी सण आठवडाभर असताना या योजनेचा विस्ताराची घोषणा करण्यात आली आहे.यामुळे देशातील गरीब जनतेला दिलासा मिळणार आहे.

छत्तीसगड मधील दुर्ग येथे पंतप्रधान एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यावेळी मोफत रेषांनी योजनेला पाच वर्षे मुदत वाढ करण्याची घोषणा केली आहे. या महिन्यात छत्तीसगडमध्ये निवडणुका होणार आहेत.90 जागांच्या छत्तीसगड विधानसभेसाठी सात नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत पीएम मोदीच्या या घोषणेला निवडणूकशीही जोडले जात आहे.

कोरोना महामारी नंतर केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली होती. कोरोना महामारीनंतर लॉकडाऊन सह अनेक कडक निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते विशेषता गरीब लोकांना खाण्यापिण्याच्या संकटांना सामना करावा लागला अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गरीब लोकांच्या मध्ये मोफत राशन योजना सुरू केली होती. 80 कोटी देवासी या योजनेचा लाभ घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

डिसेंबर मध्ये या योजनेचा कालावधीत संपणार होता. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पाच किलो गहू किंवा तांदूळ मिळतो लाभार्थ्यांनी हे त्यांनी आता मोफत मिळणार आहे केंद्र सरकारने सर्वप्रथम 30 जून 2022 रोजी याची सुरुवात केली होती. त्यानंतर अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.सध्या ही योजना डिसेंबर २०२३ मध्ये म्हणजे पुढील महिन्यात संपणार होती आता पाच वाढ केल्यानंतर आता 2028 पर्यंत लोकांना मोफत राशन मिळणार आहे.

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी

छत्तीसगडमधील सभेला संबोधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेबद्दल म्हणाले की भाजप सरकारने आता देशातील 80 कोटी गरीब लोकांना मोफत रेशन देण्याची योजना आणखी पाच वर्षे वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे.तुमचे प्रेम आशीर्वाद मला नेहमी पवित्र निर्णय घेण्याचे बळ देते. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!