Rain update today : हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचे रोज दिसून येणार आहे. पण या अवकाळी पावसाचे नेमके कारण काय व त्याचा फायदा काय ?नोव्हेंबर महिन्यात का पडतो पाऊस याबद्दल जाणून घेऊ सविस्तर माहिती.
राज्यातील ठाणे, पालघर, मुंबई , रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी 26, 27 व 28 नोव्हेंबरला येलो अलर्ट जारी करण्यात आले. हवामान खात्याचा अंदाजानुसार मागील दोन दिवसात त मुंबई सह राज्यातील अनेक ठिकाणी वाऱ्यासह मुसळधार पाऊस विजेच्या कडकडासह साधारण 30 ते 40 किमी प्रति तास या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार आहे.
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार दक्षिण मुंबईतील कुलाबा वेधशाळेने रविवारी 26 नोव्हेंबरला साधारण 9.2 मिनी पावसाची नोंद केली आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार किनारपट्टी लागत च्या भागांमध्ये चक्रीवादळ स्वरूपात वारे घोंगावत आहेत. यामुळे मुंबई व किनारपट्टी लागत या भागांमध्ये पावसाचा जास्त तीव्र प्रभाव पडणार आहे. हे वारे महाराष्ट्राच्या दिशेने पुढे जात असल्याने येत्या काही दिवसात पाऊस वाढण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.
यामुळे महाराष्ट्रातील लोकांना हिवाळ्यातील पावसाळ्याचा अनुभव घेता येणार आहे .
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा रुद्र पहिला मिळणार आहे. धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर उत्तर कोकण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भात ही पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील देण्यात आलेला आहे.